पुणे : ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ क्रीडा महोत्सवात सोमवारी (दि. १७) तिसर्या दिवशीही कोणालाच ‘पुल अप्स’चे द्विशतक गाठता आले नाही. अमरजीत मित्रा (२०६) व शोभीत गुप्ता (२०३) हे दोन खेळाडू पहिल्या दिवशी द्विशतकी पुल अप्सचे मानकरी ठरले. या दोघांनी तिसर्या दिवसअखेरपर्यंत अनुक्रमे पहिले दोन क्रमांक टिकवून ठेवले. अमन घोष हा १७८ ‘पुल अप्स’ मारून सध्या तिसर्या स्थानावर आहे.
आदर्श सोमाणी यांनी आपले वडील राजेंद्र सोमाणी यांच्या स्मरणार्थ पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साही आणि देखण्या वातावरणात ही स्पर्धा सुरू आहे. १ कोटी १५ लाख रुपयांची घसघशीत बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत दहाव्या स्थानी राहणार्या स्पर्धकालाही ७५ हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी समान बक्षीस रक्कम हे या स्पर्धेचे खास वैशिष्ट्ये होय. त्यामुळे टॉप-१० मध्ये स्थान मिळविण्यासाठी स्पर्धेत कौशल्य पणाला लावताना दिसत आहे. पुुरुषांमध्ये दोन स्पर्धकांनी दोनशेहून अधिक ‘पुश अप्स’ मारून उपस्थित प्रेक्षकांना अचंबित केले आहे. मात्र, महिला गटात तिसर्या दिवशीही कोणीला शंभर ‘पुश अप्स’चा आकडा पार करता आलेला नाही. पुढील दोन दिवसांत पुरुष गटात आणखी कोण दोनशेहून अधिक ‘पुल अप्स’ मारणार आणि महिला गटात कोणी ‘पुल अप्स’ची शंभरी ओलांडणार काय, याकडे उपस्थितांच्या नजरा असतील.
देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी
ही चळवळ : आदर्श सोमाणी
भारतात क्रीडा संस्कृती रुजावी, वाढावी या उद्देशाने आम्ही ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. कोटींची बक्षिसे फक्त क्रिकेटसारख्या काही मोजक्याच खेळांना दिली जातात. इतर खेळांतील खेळाडूंनाही चांगली बक्षिसे मिळायला हवीत म्हणून आम्ही ही सुरुवात केली आहे. हळूहळू या क्रीडा महोत्सवाची चळवळ आम्ही देशभरात वाढविणार आहोत. देशात क्रीडासंस्कृती रुजली तरच आपल्याला ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू मिळतील. तरुणाई सुदृढ असेल तरच शक्तिशाली देश निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळेच ‘फिट इंडिया’साठी आमची ही मोहीम आहे, असे ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ क्रीडा महोत्सवाचे सर्वेसर्वा आदर्श सोमाणी यांनी सांगितले. (‘Push India Push Sports Festival’, at the end of the third day Amarjit, Shobhit lead)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कौतुकास्पद… शेतकर्याच्या पोराने मारल्या अडीच हजार बैठका!
‘2000 टक्के सांगतो एमएस धोनी यावर्षी आयपीएलमधून निवृत्त होणार’, माजी सहकाऱ्याचा मोठा दावा