टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने राऊंड १६ च्या महिला एकेरी गटात डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ट हिला पराभूत करत अंतिम ८ जणींच्या फेरीत (उपांत्यपूर्व फेरी) प्रवेश केला आहे. तिने मियाला २१-१५, २१-१३ अशा सरळ सेटमध्ये धूळ चारली आहे. तिच्या या शानदार कामगिरीमुळे भारताच्या बॅडमिंटनमधील आशा अजूनही कायम आहेत.
रियो ऑलिंपिक २०१६ मध्ये रौप्य पदकावर आपले नाव कोरणाऱ्या सिंधूने मियाविरुद्ध पहिल्या सेटमध्ये सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला होता. काही प्रमाणात मियाही तिला आव्हान देत होती. मात्र, सिंधूने आपल्या उत्कृष्ट खेळीने ५ गुणांची आघाडी घेत पहिला सेट २१-१५ ने जिंकला. पहिला सेट तब्बल २२ मिनिटे चालला. (PV Sindhu advances to quarterfinal in badminton women’s singles, beats Denmark’s Mia Blichfeldt in round of 16)
#TokyoOlympics| Badminton, Women's singles Round of 16: PV Sindhu beats Denmark’s Mia Blichfeldt 21-15, 21-13 pic.twitter.com/GvaJAewICk
— ANI (@ANI) July 29, 2021
यानंतर दुसऱ्या सेटमध्येही सिंधूचे पारडे जड होते. मिया सामन्यात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र, तिला सिंधूपुढे टिकाव लागला नाही. तिने सहजरीत्या दुसरा सेटही आपल्या नावावर केला. तिने २१-१३ ने हा सेट जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-नौकानयनात भारतीय जोडीचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन; पटकावला ‘हा’ क्रमांक
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना