भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुने शुक्रवारी थायलंड ओपन स्पर्धेत प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला.
जागतिक महिला बॅडमिंटन क्रमवारीत ३ ऱ्या स्थानी असलेल्या पाव्ही सिंधुने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या सोनियाची हिचा ३६ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१७, २१-१२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
उपांत्य फेरीत सिंधुचा सामना इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्का तुनजुंग विरुद्ध होणार आहे.
पीव्ही सिंधु थायलंड ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात यशस्वी झाल्यास या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी सिंधु दुसरी भारतीय महिला बॅडमिंडनपटू ठरेल.
यापूर्वी भारताच्या सायना नेहवालने २०१२ साली थायलंड ओपनचे विजेतेपद मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-२८ वर्षीय माजी क्रिकेटपटूचा इंग्लंड क्रिकेट संघाच्या निवड समितीमध्ये समावेश
-भारतीय अ संघाचा वेस्टइंडिज अ संघावर विजय