भारताची महिला बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू आपल्या खेळाबरोबरच कमाईच्या बाबतीतही नवे पल्ले गाठत आहे. फोर्ब्सने एका वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत पीव्ही सिंधू 12व्या स्थानावर आहेे. पीव्ही सिंधू एकुलती एक भारतीय खेळाडू आहेे जी टॉप-25 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाली. सिंधू बऱ्याच काळापासून आपल्या खेळात चांगले प्रदर्शन केले आहे. ज्यामुळे तिने इतकी संपत्ती कमवली. चला तर मग जाणून घेऊयात पीव्ही सिंधूच्या संपत्तीविषयी.
पीव्ही सिंधू (PV Sindhu) हीने यावर्षी 7.1 मिलियन डॉलर म्हणजेच 58.6 कोटी रुपयांची कमाई केली. तिने मैदानावर 82 लाख रुपये कमावले , तर मैदानाच्या बाहेर तिने 57.8 कोटी रुपयेे कमावले होते. याआधी 2019मध्ये देखील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये सिंधूला स्थान मिळाले होते आणि त्यावर्षी तीने 40 कोटी रुपये कमावले होते. या यादीत सिंधू 13व्या क्रमांकावर होती. 2018मध्ये तिची कमाई 60 कोटी रुपयेे होती.
पीव्ही सिंधू हीला सर्वाधिक मिळकत जाहिरातींच्या माध्यमातून मिळते. तिच्या ब्रॅंडस्मध्ये बॅंक ऑफ बडोदा, पॅनासॉनिक, ब्रिजस्टोन, मूव, नोकिया आणि बूस्ट या ब्रॅंड्सचा समावेश आहे. 2019 या वर्षी सिंधूने चीनी ब्रॅंड लि निंगसोबत 4 वर्षांचा करार केलेला. यासाठी सिंधूने 50 कोटी रुपये घेतले होते. माध्यमांच्या अहवालानुसार सिंधूची संपत्ती 82 कोटी रुपये आहे.
पीव्ही सिंधूने नुकतीच बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर स्पर्धेत भारताच्या शटलर्सने घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेच्या भारताच्या 6 खेळाडूंनी वैयक्तिक किताब पटकावले. त्याचबरोबर मे महिन्यात थॉमस कप जिंकत इतिहास रचला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटचा कसोटी शतकाचा दुष्काळ तिसऱ्या वर्षीही कायम, मागच्या 10 डावांमध्ये नाही केले एकही अर्धशतक
तर ठरलं! गुजरातसाठी ‘ही’ भूमिका निभावणार ‘कूल केन’; नेहराने केला खुलासा