ऑस्ट्रेलियात आजपासून २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा डोळे दिपवणारा उदघाटन सोहळा काही वेळेपूर्वीच पार पडला. या उदघाटन सोहळ्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने भारतीय पथकाचे नेतृत्व केले.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने काही दिवसांपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ साठी सिंधूला भारताची ध्वजधारक करण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या वर्षभरात सिंधूने आंतरराष्ट्रीय सामन्यांत केलेला खेळ पाहता, आगामी राष्ट्रकुल स्पर्धेमधेही तिच्याकडून पदकाची आशा व्यक्त केली जात आहे. तिला या स्पर्धेत महिला एकेरी गटात अग्रमानांकन देण्यात आलेले आहे.
मागील तीन वर्षानंतर पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत एखादा बँडमिंटनपटू ध्वजधारक झाला आहे. मागील तीनही वर्ष हा मान नेमबाजांनी पटकावला होता. याआधी २००६ मध्ये राज्यवर्धन सिंग राठोड, २०१० ला अभिनव बिंद्रा तर २०१४ ला विजय कुमार हे राष्ट्रकुल स्पर्धेत ध्वजधारक होते.
यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतातील विविध १५ क्रीडा प्रकारातील खेळाडु सहभागी होणार आहेत. बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायक्लिंग, जिमनॅस्टिक्स, हॉकी, लॉन बाउलिंग, पॅरा स्पोटर्स यासह विविध खेळांमधील २२० खेळाडू या स्पर्धेत भारताचे प्रतिनीधीत्व करणार आहेत.
#TeamIndia walked into the #CarraraStadium led by @Pvsindhu1 #StayTuned to watch more from the #GC2018@afiindia @BAI_Media @BFI_basketball @BFI_official @OfficialCFI @TheHockeyIndia @OfficialNRAI @indiasquash @ttfitweet @WeightliftingIN @FederationWrest @ParalympicIndia pic.twitter.com/JMSA4n92Xg
— Team India (@WeAreTeamIndia) April 4, 2018