भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आता एशियन गेम्समध्ये खेळताना दिसणार आहे. यावेळी तिच्याकडून या स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. असे असतानाच आता तिने आपल्या कठीण काळाविषयी एक मोठा खुलासा केला आहे. आपल्या या काळात आपल्याला विराट कोहली याने प्रेरणा दिल्याची कबुली तिने दिली.
एशियन गेम्ससाठी चीनला जाण्यापूर्वी तिने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिने आपल्यावर भारताचा वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली याचा मोठा प्रभाव असल्याचे म्हटले. ती म्हणाली,
“विराट कोहली एक प्रेरणास्थान आहे. माझ्या कठीण काळात त्याने मला प्रेरणा दिली. मी त्याच्या मुलाखती वाचल्या आणि मी विराटचा खेळही पाहिला. विराटही अशा टप्प्यातून गेला जिथे तो धावा करू शकत नव्हता. मात्र, तो त्यातून बाहेर आला. प्रत्येक खेळाडूला या परिस्थितीतून जावे लागते. यातून बाहेर येणे सर्वांनाच जमते असे नाही.”
सिंधू ही सध्या भारताची अव्वल क्रमांकाची बॅडमिंटनपटू आहे. हॅंगझू येथे होणाऱ्या एशियन गेम्समध्ये ती सुवर्णपदकाची दावेदार मानली जातेय. यापूर्वी झालेल्या 2014 व 2018 एशियन गेम्समध्ये तिने अनुक्रमे कांस्य व रजत पदक पटकावले होते. याव्यतिरिक्त तिने रियो ओलंपिक व टोकियो ओलंपिक मध्ये पदके जिंकली आहेत.
(PV Sindhu Said Virat Kohli Is My Inspiration)
महत्वाच्या बातम्या –
U19 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ देशात भरणार भविष्यातील सिताऱ्यांचा मेळा
भेदक गोलंदाजीपुढे काँगारूंनी टेकले गुडघे! भारतासाठी मोहम्मद शमी एकटाच चमकला