आयसीसी अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 च्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे, ही स्पर्धा 13 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान श्रीलंकेत होणार आहे. स्पर्धेच्या 15 व्या आयोजनात 16 संघ सहभागी होतील. तसेच स्पर्धेच्या स्वरूपामध्ये काही उल्लेखनीय बदल करण्यात आले आहेत.
श्रीलंका तिसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार असून, 2006 नंतर ते पहिल्यांदाच स्पर्धेचे आयोजन करतील. यजमान श्रीलंका13 जानेवारी रोजी झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्याने स्पर्धेचे उद्घाटन करेल. विद्यमान विजेता भारत दुसऱ्या दिवशी 2020 चे विजेते बांगलादेशविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
Mark your calendars ????️
The schedule for the 2024 ICC U19 Men’s Cricket World Cup is out!#U19CWC | Details ????https://t.co/nuy6GM0Uwc
— ICC (@ICC) September 22, 2023
या विश्वचषकात 16 संघांना चार गटांमध्ये विभागले जाईल, प्रत्येक गटात चार संघ असतील, परंतु प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ आता सुपर सिक्स फेरी जातील. 13 ते 21 जानेवारी दरम्यान साखळी फेरीचे सामने होतील. भारतीय संघाचा समावेश अ गटात असून भारता व्यतिरिक्त बांगलादेश, अमेरिका व आयर्लंड हे देखील याच गटात आहेत. श्रीलंकेतील पाच मैदानांवर हा विश्वचषक खेळला जाईल.
स्पर्धेच्या इतिहासाचा विचार केल्यास भारतीय संघ सर्वात यशस्वी संघ आहे. भारतीय संघाने 2000 मध्ये मोहम्मद कैफ यांच्या नेतृत्वात श्रीलंकेतच प्रथम विश्वचषक आपल्या नावे केला होता. त्यानंतर 2008 मध्ये विराट कोहली यांच्या नेतृत्वात, 2012 मध्ये उन्मुक्त चंद, 2018 मध्ये पृथ्वी शॉ व 2022 मध्ये यश धूल याच्या नेतृत्वात भारतीय संघ हा विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरलेला. मागील वर्षी भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
(ICC U19 World Cup Schedule Annouced)
महत्वाच्या बातम्या –
सेट झालेल्या स्मिथचा त्रिफळा, शमीच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज गुडघ्यांवर
कशी आहे विराटची World Cupमधील कामगिरी? 2 वर्ल्डकपमध्ये ठोकलंय शतक, वाचा लेखाजोखा