पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिससंघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पीवायस अ व क, डेक्कन अ, एफसी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत इलाईट डिव्हिजन गटात साखळी फेरीत पहिल्या सामन्यात शैलेश डोरे, राधिका कानिटकर, हिमांशू गोसावी, सारंग पाबळकर, अमित नाटेकर, अनुप मिंडा, वरूण मागिकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी क संघाने डेक्कन ड संघाचा 24-5असा सहज पराभव केला.
त्यांनतर दुसऱ्या सामन्यात पीवायसी क संघाने सोलारिस आरपीटीए संघाचा 24-9असा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. याआधीच्या साखळी सामन्यात सलग दोन विजय मिळविणाऱ्या डेक्कन अ संघाला लॉ कॉलेज लायन्स संघाविरुद्ध पुढे चाल देण्यात आली.
एफसी अ संघाने पीवायसी ब संघाचा 23-12असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. पीवायसी अ संघाने टेनिस नट्स संघाचा 24-9असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. विजयी संघाकडून डॉ.अभय जमेनीस, अभिषेक ताम्हाणे, केतन धुमाळ, ऋतू कुलकर्णी, जयंत कढे, सुंदर अय्यर, परज नाटेकर यांनी अफलातून कामगिरी केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी: इलाईट डिव्हिजन
पीवायसी अ वि.वि.टेनिस नट्स 24-9(100अधिक गट: डॉ.अभय जमेनीस/अभिषेक ताम्हाणे वि.वि.राजेश मित्तल/गिरीश कुलकर्णी 6-2; खुला गट: केतन धुमाळ/ऋतू कुलकर्णी वि.वि.अमित किंडो/दिपक पाटील 6-1; 90अधिक गट: जयंत कढे/सुंदर अय्यर वि.वि.रवी जौकनी/आनंद कोटस्थाने 6-2; खुला गट: अभिषेक ताम्हाणे/परज नाटेकर वि.वि.जय बॅनर्जी/मनोज कुसाळकर 6-4);
पीवायसी ब वि.वि.बालेवाडी ब 24-11(100अधिक गट: राजू साठे/ध्रुव मेड पराभूत वि.खन्ना/मनू एचएन 4-6; खुला गट: अमोघ बेहेरे/सारंग देवी वि.वि.मनू एचएन/दत्ता धोंगडे 6-2; 90अधिक गट: मिहीर दिवेकर/हर्षा हळवे वि.वि.शैलेंद्र मिश्रा/विक्रांत सुर्वे 6-3;खुला गट: ध्रुव मेड/अभिषेक सोमण वि.वि.सुनील कुसाळकर/जॉर्ज 6-0);
पीवायसी क वि.वि.डेक्कन ड 24-5(100अधिक गट: शैलेश डोरे/राधिका कानिटकर वि.वि.संजय कामत/अजय जाधव 6-0;खुला गट: राधिका कानिटकर/हिमांशू गोसावी वि.वि.आशिष पुंगलिया/पराग देसाई 6-2; 90अधिक गट: सारंग पाबळकर/अमित नाटेकर वि.वि.आदित्य खटोड/जितेंद्र जोशी 6-3; खुला गट: अनुप मिंडा/वरूण मागिकर वि.वि.संजय कामत/विक्रम उंबरानी6-0);
डेक्कन अ पुढे चाल वि.लॉ कॉलेज लायन्स 24-0;
पीवायसी क वि.वि.सोलारिस आरपीटीए 24-9(100अधिक गट: शैलेश डोरे/राधिका कानिटकर वि.वि.नाम जोशी/रवींद्र पांडे 6-4;खुला गट: अनुप मिंडा/वरुण मागिकर वि.वि.संजीव घोलप/रवींद्र कात्रे 6-1; 90अधिक गट: अमित नाटेकर/सारंग पाबळकर वि.वि.सचिन खिलारे/राजेंद्र देशमुख 6-1; खुला गट: हिमांशू गोसावी/राधिका कानिटकर वि.वि.रवींद्र पांडे/जयंत पवार 6-3);
एफसी अ वि.वि.पीवायसी ब 23-12 (100अधिक गट: संजय रासकर/पुष्कर पेशवा वि.वि.ध्रुव मेड/राजू साठे 6-2; खुला गट: गणेश देवखिळे/सचिन साळुंखे पराभूत वि.अमोघ बेहेरे/सारंग देवी 5-6(8-10); 90अधिक गट: अभिजित तावरे/पंकज यादव वि.वि.हर्षा हळबे/मिहीर दिवेकर 6-2; खुला गट: धनंजय कवडे/पुष्कर पेशवा वि.वि.ध्रुव मेड/अभिषेक सोमण 6-2).