---Advertisement---

जुई-ओजस यांना विजेतेपद, 16वी अमनोरा पीवायसी एचटीबीए कप सुपर 500 रँकिंग जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा

On: बुधवार, जानेवारी 21, 2026 3:22 PM
---Advertisement---

पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजित ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅटमिंटन कोर्टवर झाली. या स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अनन्या गाडगीळने एस. डाखणेवर १५-७, १५-३ अशी सहज मात केली आणि जेतेपद पटकावले. यानंतर १९ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत दुस-या मानांकित जुई जाधवने अग्रमानांकित नाव्या रांकाला १५-८, ६-१५, १५-१३ असा पराभवाचा धक्का दिला आणि जेतेपद पटकावले. स्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत केयारा साखरेने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. तिने चौथ्या मानांकित काश्वीसिंहला १५-९, १५-१० असे सहज पराभूत केले.

स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अभिज्ञान सिंघाने बाजी मारली. त्याने अंतिम फेरीत माधव कामतला ७-१५, १५-५, १५-५ असे नमविले. १३ वर्षांखालील मुलांच्या गटात अद्वैत फेरेने विजेतेपद पटकावले. त्याने अग्रमानांकित अर्चित खान्देशेला १७-१५, १५-१३ असा पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे अर्चितचे दुहेरी यशही हुकले. स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या गटात अर्जुन श्रीगडीवारने विजेतेपद पटकावले. त्याने अंतिम फेरीत अग्रमानांकित हृदान पाडवेला १५-१२, १५-१० असे नमविले आणि जेतेपद निश्चित केले. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात ओजस जोशीने विजेतेपद पटकावले. त्याने अंतिम फेरीत अग्रमानांकित सार्थक पाटणकरचे आव्हान १५-१२, १५-९ असे परतवून लावले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अविनाश जाधव, सचिव उदय साने, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकिय संचालक अनिरुद्ध देशपांडे, कॉर्पोरेट अॅथलिट्सचे संस्थापक आणि स्पर्धेचे संयोजन सचिव अभिजीत चांदगुडे आणि पीवायी हिंदू जिमखान्याचे सचिव सारंग लागू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

निकाल

अंतिम फेरी

१७ वर्षांखालील मुले दुहेरी – दिव्यान कौशिक-रेहान सय्यद वि. वि. अवनीश-अयांश यारागट्टी (१५-१०, १५-११)

१३ वर्षांखालील मिश्र दुहेरी – परस्मय राणे-ऋत्वा पांडे वि. वि. हिमांश हरगुणानी-अनिशा पिंगे (१५-१२, १५-९, १५-१३)

१३ वर्षांखालील मुली दुहेरी – अनिशा पिंगे-ऋत्वा पांडे वि. वि. पूर्वा हांडे – तेजस्वी (१६-१४, १५-१२)

४० वर्षांवरील गट – हर्षद भागवत वि. वि. आदित्य काळे (१५-५, १५-५)

महिला दुहेरी – अदिती काळे – योगिता साळवे वि. वि. अर्पिता अर्डेय-ज्योती रावत (१५-१०, १५-८)

३० वर्षांवरील पुरुष एकेरी – अजय कैठ वि. वि. गुरुप्रसाद राऊत (१५-६, १५-११)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---