पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने प्राचार्य दि ब देवधर यांच्या स्मरणार्थ क्लबच्या सुफियान सय्यद, आदित डोंगरे, वेदांत हांचे आणि साईराज चोरगे या चार नवोदित खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात आली.
कै. प्राचार्य दि. ब. देवधर यांच्या कुटुंबीयांनी पी वाय सी क्लब बरोबर, पी वाय सी क्लबमध्ये खेळणाऱ्या नवोदित क्रिकेटपटूंना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले होते. या वर्षभरात चमकदार कामगिरी करणाऱ्या सुफियान सय्यद (सोळा वर्षांखालील डावखुरा सलामीचा फलंदाज), आदित डोंगरे (चौदा वर्षांखालील डावखुरा फिरकी गोलंदाज ), वेदांत हांचे (चौदा वर्षांखालील यष्ठीरक्षक आणि डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज) आणि साईराज चोरगे (सोळा वर्षांखालील उजव्या हाताचा सलामीचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज) या नवोदित खेळाडूंना प्रत्येकी २५ हजार रुपये व स्मृतीचिन्ह देण्यात आले. या खेळाडूंना भारताचे माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या वेळी बोलताना श्री चंदू बोर्डे यांनी मी स्वतः देवधरांबरोबर काही सामने खेळलो असल्याचे नमूद करताना त्याच्या जुन्या आठवणींना उजळा दिला. यावेळी पी वाय सी क्लबचे अध्यक्ष श्री. कुमार ताम्हाणे, सचिव सारंग लागू, क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष श्री. विकास काकतकर तसेच देवधर कुटुंबियांच्या वतीने रंजना बर्वे, श्री विजय बर्वे, डॉ दीपक आठवले, डॉ नंदिनी आठवले, डॉ वृषाली आठवले, आदित्य पवनगडकरसह, पी वाय सी चे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, अभिषेक ताम्हाणे, तुषार नगरकर, शिरीष साठे, तन्मय आगाशे, माजी रणजीपटू इंद्रजित कामतेकर, पराग शहाणे, चारुदत्त कुलकर्णी, मनीष चौबळ आणि कपिल खरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी रणजीपटू निरंजन गोडबोले यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या –
बेचाळीसाव्या पीएसपीबी आंतर युनिट गोल्फ स्पर्धेत ओआयएल संघाला सांघिक विजेतेपद