पुणे : जिज्ञासा चौधरी, सानिका पाटणकर, श्रेया भोसले, संस्कृती जोशी यांनी पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या उपांत्यपूर्व फेरीत जिज्ञासा चौधरीने प्रणाली डोईफोडोवर २१-१३, २१-१७ अशी मात केली. उपांत्य फेरीत जिज्ञासाची लढत सानिका पाटणकरविरुद्ध होईल. सानिकाने उपांत्यपूर्व फेरीत सफा शेखवर २१-१२, २१-१५ असा विजय मिळवला. या गटातील दुसरी उपांत्य लढत श्रेया भोसले आणि संस्कृती जोशी यांच्यात रंगणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत संस्कृतीने परिधी बुधवारला २१-१३, २०-२२, २१-१८ असे नमविले, तर श्रेयाने श्रीया उत्पटवर २१-९, २१-७ अशी सहज मात केली.
या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या उपांत्यपूर्व फेरीत शरयू रांजणेने मनीषा थिरुकोंडावर २१-११, २१-७ अशी, तर स्नेहा भिसेने अनन्या बोंद्रेवर २१-९, २१-१४ अशी मात केली. यानंतर सोयरा शेलारने सान्वी पाटीलवर २१-५, २०-२२, २१-१८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवून अंतिम चारमध्ये प्रवेश केला. शर्वरी सुरवसेने ख्याती कत्रेवर २२-२०, ११-२१, २१-१८ अशी मात करून आगेकूच केली. (PYC HTBA Amanora Cup District Ranking Badminton Tournament, Jijiya, Sanika in semi-finals)
निकाल – उपांत्यपूर्व फेरी – ११ वर्षांखालील मुली – दिविशा सिंग वि. वि. शान्वी सिनागरे २१-४, २१-१०, अग्रिमा राणा वि. वि. स्वस्ती रूगे २१-९, २१-९, वल्लरी वाटणे वि. वि. कृष्णाली वांद्रे २१-११, २१-१३, अन्वी बारावकर वि. वि. क्रिशांगी असिजा २१-१७, २१-१५.
११ वर्षांखालील मुले – हिमांश हरगुनानी वि. वि. कबीर देसाई २१-१४, २१-७, बुरहनुद्दीन अगाशीवाला वि. वि. अर्जुन तुळपुळे २१-२, २१-७, आरुष सप्रे वि. वि. वेदांत मोरे २३-२१, २१-१४, अद्वैत फेरे वि. वि. ईशान रॉय २१-१५, २१-१७.
१३ वर्षांखालील मुली – ख्याती कत्रे वि. वि. रिषिका रसाळ २१-११, २१-५, रुद्रानीराजे निंबाळकर वि. वि. जस्नम कौर चहल २१-६, २१-१२, आराध्या ढेरे वि. वि. तेजस्वी भुतडा १८-२१, २१-१७, २१-१९, कायरा रैना वि. वि. समन्वया धनंजय १७-२१, २१-१९, २१-१०.
१३ वर्षांखालील मुले – मीर शाहझार अली वि. वि. अद्वय देशमुख १४-२१, २१-१६, २१-१८, एस. सोमजी वि. वि. अर्जुन श्रीगडीवार २१-११, २१-१०, शारव जाधव वि. वि. यश मोरे २१-१९, १०-२१, २१-१९, हृदान पाडवे वि. वि. अतिक्ष अगरवाल २१-११, २१-१०.
१५ वर्षांखालील मुले – कपिल जगदाळे वि. वि. राघवेंद्र यादव २१-१४, २१-१४, अभिक शर्मा वि. वि. तनीष अडे २१-१९, २४-२२, अरहम रेदासानी वि. वि. विराज सराफ २१-१३, २१-८, अभिज्ञान सिंघा वि. वि. एस. सोमजी २१-९, २१-९.
१७ वर्षांखालील मुले – अवधूत कदम वि. वि. सुदीप खोराटे २१-१२, २१-१३, सार्थक पाटणकर वि. वि. अर्जुन देशपांडे २१-९, २१-११, विहान मूर्ती वि. वि. देवांश सकपाळ २१-१०, २१-९, कविन पटेल वि. वि. ओजस जोशी २३-२१, २१-१२.
१९ वर्षांखालील मुले – आद्य पारसनीस वि. वि. वात्सल्य गर्ग २१-१७, २१-५, यशराज कदम वि. वि. अवधूत कदम २१-१२, २१-१६, सार्थक पाटणकर २१-७, २१-१३, देवांश सकपाळ वि. वि. सिद्धांत कोल्हाडे २१-१८, २१-१३.
महत्वाच्या बातम्या –
67व्या शालेय राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत सांघिक गटात महाराष्ट्र संघाचा अंतिम फेरीत प्रवेश
इंग्लंडमधील लीड्स बेकेट विद्यापीठाचे विद्यार्थी आयएसएमएस इन्स्टिट्यूटला भेट देणार