पुणे, दि. 6 डिसेंबर 2022 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत सिद्धेश वरघंटे(5-93), इझान सय्यद(5-27) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर केडन्सचा पुना क्लब संघावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवत शानदार सुरुवात केली. तर, अन्य लढतीत डेक्कन जिमखाना, पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी, केडन्स या संघानी पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
सनग्लो क्रिकेट स्टेडियमवरील सामन्यात पहिल्या डावात केडन्स संघाने 65.2 षटकांत सर्वबाद 296धावा केल्या. याच्या उत्तरात पूना क्लब संघाचा 30.1 षटकांत सर्वबाद 101 धावावर गुंडाळून त्यांच्यावर फॉलोन लादला. यात देव नवले 28, अखिलेश गवळे 26 यांनी थोडासा प्रतिकार केला. केडन्स संघाकडून इझान सय्यद (5-27), निलय शिंगवी(3-34), शुभम खरात(1-10) यांनी सुरेख गोलंदाजी करत केडन्स संघाला पहिल्या डावात 195 धावांची भक्कम अशी आघाडी मिळवून दिली. आज दुसऱ्या डावात फलंदाजीस आलेल्या पूना क्लब संघाला 56.3 षटकात सर्वबाद 233धावा पर्यंत मजल मारता आली. यात सौरभ दोडके 51, अखिलेश गवळे 49, आर्यन गाडगीळ 27, हर्ष ओसवाल 25 यांनी धावा केल्या. केडन्स संघाकडून सिद्धेश वरघंटे(5-93), निलय शिंगवी(3-21)यांनी अफलातून गोलंदाजी केली. विजयासाठी 38धावांचे लक्ष्य केडन्स संघाने 9 षटकात एकही गडी न गमावता 42धावा करून पूर्ण केले. यात सिद्धेश वरघंटे नाबाद 28, अथर्व धर्माधिकारी नाबाद 12 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर सिद्धेश वरघंटे ठरला.
पीवायसी मैदानावरील सामन्यात पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघावर पहिल्या डावाच्या 37 धावांच्या आघाडीच्या जोरावर विजय मिळवला. पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी(पीबीकेजेसीए) आज 17 षटकात बिनबाद 53धावापासून खेळ पुढे सुरु झाला. तत्पूर्वी पीवायसी संघाने पहिल्या डावात 70.5 षटकांत सर्वबाद 270धावा केल्या. याच्या पीबीकेजेसीए संघाने 77 षटकांत सर्वबाद 307धावा करून आघाडी मिळवली. यात अभिमन्यू जाधवने संयमी खेळी करत 212 चेंडूत 14चौकार व 2षटकाराच्या मदतीने नाबाद 107 धावांची शतकी खेळी केली. त्याला ओंकार खाटपेने 62 धावा काढून साथ दिली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 113चेंडूत 91 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दिग्विजय जाधव 39, सिद्धार्थ म्हात्रे 24, निलय नेवस्कर 19 यांनी धावा केल्या. पीवायसीकडून आदित्य डावरे(3-88), नचिकेत वेर्लेकर(3-13), साहिल चुरी(2-77) यांनी सुरेख गोलंदाजी केली. दुसऱ्या डावात आज दिवस अखेर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 16 षटकात बिनबाद 51धावा केल्या. सामना अनिर्णित राहिल्यामुळे पीबीकेजेसीए संघ पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी ठरला.
डिझायर स्पोर्ट्स मैदानावरील सामन्यात आज युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या 4 षटकात बिनबाद 9धावापासून खेळ सुरु झाला. तत्पूर्वी काल पहिल्या डावात डेक्कन जिमखाना संघाने 82 षटकांत 8बाद 429धावा केल्या. याच्या उत्तरात आज युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने दिवसअखेर 85.4 षटकांत सर्वबाद 225 धावा केल्या. यात ओंकार मोहिते नाबाद 52, रोहित खरात 39, निखिल जोशी 25, अद्वय शिधये 19, आनंद ठेंगे 16, निमीर जोशी 14 यांनी धावा केल्या. डेक्कन जिमखाना संघाकडून धीरज फटांगरे(3-30), आत्मन पोरे(3-20), आदर्श बोथरा(2-6)यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. सामना अनिर्णित राहिल्यामुळे डेक्कन जिमखाना पहिल्या डावाच्या आघाडीवर 204 धावांनी विजय मिळवला. बारणे अकादमी मैदानावरील क्लब ऑफ महाराष्ट्र व डीव्हीसीए यांच्यातील सामना अनिर्णित राहिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पीवायसी मैदान: पहिला डाव: पीवायसी हिंदू जिमखाना: 70.5 षटकांत सर्वबाद 270धावा वि. पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी(पीबीकेजेसीए):77 षटकांत सर्वबाद 307धावा(अभिमन्यू जाधव नाबाद 107(212,14×4,2×6), ओंकार खाटपे 62(52,10×4,2×6), दिग्विजय जाधव 39(67,8×4), सिद्धार्थ म्हात्रे 24, निलय नेवस्कर 19, आदित्य डावरे 3-88, नचिकेत वेर्लेकर 3-13, साहिल चुरी 2-77); पीबीकेजेसीएने पहिल्या डावात 37 धावांची आघाडी घेतली.
दुसरा डाव: पीवायसी हिंदू जिमखाना: 16 षटकात बिनबाद 51धावा(अमेय भावे नाबाद 25, श्रेयश वाळेकर नाबाद 22) वि.पीबीकेजेसीए: ; सामना अनिर्णित; पहिल्या डावाच्या आघाडीवर पीबीकेजेसीए विजयी
डिझायर स्पोर्ट्स मैदान: पहिला डाव: डेक्कन जिमखाना: 82 षटकांत 8बाद 429धावा(डावघोषित) वि. युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 85.4 षटकांत सर्वबाद 225 धावा(ओंकार मोहिते नाबाद 52 (109,10×4), रोहित खरात 39 (64,7×4) , निखिल जोशी 25, अद्वय शिधये 19, आनंद ठेंगे 16, निमीर जोशी 14, धीरज फटांगरे 3-30, आत्मन पोरे 3-20, आदर्श बोथरा 2-6); सामना अनिर्णित; डेक्कन जिमखाना पहिल्या डावाच्या आघाडीवर(204 धावांनी) विजयी;
सनग्लो क्रिकेट स्टेडियम: पहिला डाव: केडन्स: 65.2 षटकांत सर्वबाद 296धावा वि. पूना क्लब: 30.1 षटकांत सर्वबाद 101धावा(देव नवले 28, अखिलेश गवळे 26, इझान सय्यद 5-27, निलय शिंगवी 3-34, शुभम 1-10); केडन्सकडे पहिल्या डावात 195 धावांची आघाडी ;
दुसरा डाव: पूना क्लब: 56.3 षटकात सर्वबाद 233धावा(सौरभ दोडके 51(89,10×4,1×6), अखिलेश गवळे 49(76,6×4,1×6), आर्यन गाडगीळ 27, हर्ष ओसवाल 25, सिद्धेश वरघंटे 5-93, निलय शिंगवी 3-21) पराभूत वि. केडन्स:9 षटकात बिनबाद 42धावा(सिद्धेश वरघंटे नाबाद 28, अथर्व धर्माधिकारी नाबाद 12); सामनावीर-सिद्धेश वरघंटे; केडन्स संघ 10 गडी राखून विजयी;
बारणे अकादमी मैदान: पहिला डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 76.3 षटकात 8बाद 294धावा(डाव घोषित)(अश्कान काझी 78(97,16×4), यश क्षीरसागर 45(61,7×4), राजवर्धन उंद्रे 42(49,9×4), अद्वैत मुळ्ये 34, आदिल अन्सारी 27, रोहित चौधरी 4-72, अॅलन रॉड्रिग्ज 2-55) वि डीव्हीसीए: 40 षटकात 6बाद 175धावा(अंश धूत 79(89,14×4), आदित्य एकशिंगे 45(87,7×4), सूरज, गोंड 18, वैभव गोसावी 2-41, रोनक अन्सारी 1-29, शुभम मैड 1-36); सामना अनिर्णित;
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माने दुखापतीविषयी स्वतः दिली माहिती, बांगलादेश दौऱ्यातून घेऊ शकतो माघार?
चाहत्यांना फक्त कारण पाहिजे ! टी20मध्ये मैदान गाजवणाऱ्या विराटला, वनडेतील कामगिरीमुळे केलं ट्रोल