पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी-पुसाळकर सु-रक-क्षा कंपोनंट्स पीवायसी प्रीमियर लीग क्रिकेट 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कारा इंटलेक्ट यांच्या व्यवस्थापन आणि संकल्पनेतून होणारी ही स्पर्धा दि.10 ते 16 नोव्हेंबर 2019 या कालावधीत पीवायसी मैदानावर होणार आहे.
पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे आणि क्लबचे सचिव आनंद परांजपे, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. या स्पर्धेत 15 संघ सहभागी झाले असून घेण्यात आलेल्या लिलावात हर्षल गंद्रे(5000पॉंईटस, टस्कर्स), श्रीनिवास चाफळकर(4700पॉईंट्स, टस्कर्स), रोहन छाजेड(4600पॉईंट्स, डॉल्फिन्स), अभिषेक ताम्हाणे(4200पॉईंट्स, टायगर्स), देवेंद्र चितळे(4200पॉईंट्स, बुल्स), रवी कासट(4100पॉईंट्स, जॅगवॉर्स), प्रतीक वांगीकर(4100पॉईंट्स, कोब्राज), चारुदत्त दातार(4100पॉईंट्स, चिताज) आणि तन्मय चोभे(4100पॉईंट्स, स्कॅवेंजर्स) हे सर्वाधिक महागडे खेळाडू ठरले.
विविध क्रिडाप्रकारांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी पीवायसी क्लब नेहमीच आघाडीवर असतो. स्पर्धेला पुसाळकर सु-रक-क्षा कंपोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रायोजकत्व लाभले असून ब्रिहंस ग्रीनलीफ, वूमेन्स क्रिक झोन आणि कूपर यांचे सहप्रायोजकत्व मिळाले आहे.
ते पुढे म्हणाले की, स्पर्धेत प्रत्येक संघात एकुण 9 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे सामने हे 6 षटकांचे होणार आहेत. स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू असून सर्व सामने सायंकाळी 4.30 ते रात्री 10.30 या वेळेत होणार असून काही सामने विद्युताप्रकाश झोतात होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना दि.16 नोव्हेंबर 2019 या दिवशी होणार आहे.
स्पर्धेत बुल्स, चिताज्, कोब्राज्, डॉल्फिन्स, हॉग्स्, जॅगवॉर्स, लायन्स,एनएच वुल्वस, पँथर्स, रायनोज,स्कॅवेंजर्स, स्कायलार्कस, टायगर्स, टस्कर्स, विअर वुल्वस् हे 15 संघ भाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेतील १५ संघांची ३ गटात विभागणी करण्यात आली असून यामध्ये प्रत्येक 5 आणि 6 संघांचा समावेश असणार आहे. तसेच, या तीनही गटांतील अव्वल संघ उपांत्यपुर्व फेरीसाठी पात्र ठरणार असून आणखी दोन संघ गुणसरासरी आणि नेटरनरेटच्या आधारावर पात्र ठरणार आहेत.
प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याचा व क्रिकेटवरचे प्रेम व्यक्त करण्याचा अनुभव या माध्यमांतून सभासदांना मिळणार आहे. या उपक‘माचे स्वरूप जरी स्पर्धात्मक असले, तरी पण प्रत्यक्षात सभासदांना या खेळाची मजा लुटता येणार आहे. विजेत्या संघाला ज्ञानेश्वर आगाशे स्मृती करंडक देण्यात येणार असून याशिवाय वैयक्तिक पारितोषिकेहि दिली जाणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये विनायक द्रविड, अभिषेक ताम्हाणे, सारंग लागु, तन्मय आगाशे, तुषार नगरकर, , देवेंद्र चितळे, निखिल शहा व कपिल खरे यांचा समावेश आहे.
यावेळी कूपर क्रॉपचे वैभव नवाथे, बृहन्स ग्रीन लिफचे आशुतोष आगाशे, वूमेन्स क्रिक झोनचे अभिजित खानविलकर, पुसाळकर सु-रक-क्षाचे रोहन आणि विजय पुसाळकर, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे, क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे आणि क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील संघांची यादी खालीलप्रमाणे-
बुल्स- देवेंद्र चितळे, पराग चोपडा, उदय जाधव, शिरिष कर्णीक, योगेश भोंगला, सिध्दांत चोपडा, निल बेलवलकर, सुमेध गांगल, पिनाकीन मराठे,सोहन वर्तक,नचिकेत येवले,अमित धर्मा, अमोल दामले
चिताज – आत्मन बागमार, तुषार मेंगळे, विक्रांत पाटील, सतिश जैन राहुल पंडीत, पराग मेंगळे,नकुल पटेल, अमिर अजगावकर, चिन्मय जोशी, चारुदत्त दातार, विनित रुकारी, मंदार विंझे, चिन्मय चितपुतकर
कोब्राज – मंदार देवगावकर, विशाल गोखले, संजीव घोलप,हेमंत पिंपळे,साहिल ठाकरे,शान मदन, अर्चित गोखले, सिध्दार्थ दाते, समिर जोग, असिम देवगावकर, प्रतिक वांगीकर, नितेश जैन, देव शेवाळे
डॉल्फिन्स – अश्विन शहा, रोहन छाजेड, आनंद शहा, अनिल छाजेड, अशुतोष आगाशे, अभिजीत मुनोत, सुधांशू मेडसीकर, यश जोगळेकर, विश्वेश कुंभोजकर, आशय कश्यप, क्रिश शहा, राजशेखर करमरकर, गोपी शेवाळे
हॉग्स – सिध्दर्थ बदामीकर, अभिजीत तावरे, प्रशांत वैद्य, मनिष सबाडे, शिरिष आपटे, विक्रम ओगळे, हर्षा जैन, अनिश राणे, यश परांजपे, अदित्य गांधी, अभिजीत खानविलकर, सलील चोदनकर, ईशान गुप्ते
जॅगवॉर्स – अश्विन त्रिमल, रविंद्र कासट, राजेश कासट, जयकांत वैद्य, समिर जोशी, रिषभ गादिया, अक्षय ओक, अकाश सुर्यवंशी, मंदार चितळे, अंकित दामले, निखिल डोंगरे, अरिन माळी, जय उतगीकर
लायन्स – गौरव कासट, कुणाल भुरत, महेंद्र गोखले, सचिन जोशी, मकरंद चितळे, अभिजीत राजवाडे, विमल हंसराज, ओजस सबाडे, निल हलबे, विशाल भुरत, निरन भुरत, रोहन जमेनिस,अभय भिसे, मिहिर ठोंबरे, तुषार नगरकर
एनएच वुल्वस – अनुज लोहाडे, प्रसाद जाधव, अभय बागमारे, शेखळ मालवाडे, हरजीत सिंग मथारू, शिरिष साठे, अपुर्व जैन, अनवीर नन्ना, गीत सराफ, गौरव पाटील, पार्थ किल्लेदार. सनत चितळे, अभय राजगुरू, निखिल चितळे
पँथर्स – आशिष देसाई, कर्णा मेहता, निलेश केळकर, सिध्दार्थ साठ्ये, जयदिप कुंटे, रोहित भालेराव, अनुज मेहता, प्रेरीत गोयल, आर्यन देसाई, आनंद शहा, अलख गदा, अमेय कुलकर्णी, कोदार जोशी, राहुल रोडे
रायनोज – रोहित बर्वे, सिध्दार्थ किर्लोसकर, सलिल देशपांडे, रोहन पुसलकर, कल्पक पत्की,निरंजन गोडबोले, संकल्प गोईल, अमित परांजपे, शिव किर्लोसकर, राघव बर्वे, नकुल बेलवलकर, अभिषेक सोमन, समिर जालन
स्कॅवेंजर्स – नंदन डोंगरे, तन्मय चोभे, दिपक लुनावत, मिलिंद शालगर, अनिकेत जगताप, शैलेश लिमये, नचिकेत जोशी, दर्शन कंकरीया, सुमेध शहा, आर्य देवधर, अनिकेत सहस्त्रबुध्दे, अदित्य जितकर, सुरज शहा.
स्कायलार्कस – अंकुश जाधव, प्रशांत सुतार,बाळ कुलकर्णी, मोमन हनिफ, नितिन सरदेसाई, श्रवण हार्डीकर, गौरव भगत, आशिष राठी, अनुज साबडे, अभिषेक अगाशे, गौरव सागावकर, करण बापट, अव्दैत जोशी
टायगर्स- अभिषेक ताम्हाणे, मधुर इंगळहाळीकर, अशुतोष शहा, सचिन काळे, अमित कुलकर्णी, ईशान तळवलकर, विश्वेश कटक्कर, शार्दुल वाळिंबे, रोहित मेहेंदळे, अथर्व गोडबोले, शैलेश बोथ्रा, सुशांत भालेराव, महेश शेट्टी
टस्कर्स- हर्षल गंद्रे, श्रीनिवास चाफळकर, अभय माळी, किरण गार्गे, समिर बाक्रे, रोहित सुगंधी, ईशान भाले, सोहन अंगले, क्षितिज लोहीया, निशाद चौघुले, अंजनेय साठे, रोनित जैन, प्रियदर्शन डुंब्रे, सौरभ चिंचनकर
विअर वुल्वस- जयदीप गोडबोले, राहुल कुनकुलोल, राजेश राठोड, राजन जोशी, राहुल गांगल, अभिजीत गानु, कृष्णा मेहता, जयदीप गोखले, अभिजीत भाटे, अकांश जैन, अनिरुध्द सानप, अमित गुप्ता, यश शहा.