चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स संघ क्वॉलिफायर एकसाठी पात्र ठरले आहेत. शनिवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचा निकाल लागण्याआधीच हे निश्चित झाले. नेट रन रेटच्या आभावामुळे केकआर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली. मंगळवारी (23 मे) क्वॉलिफायन 1 सामना सीएसके आणि गुजरात टायटन्समध्ये खेळला जाईल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.
KKR have been eliminated from IPL 2023. pic.twitter.com/mNqxDAR2iN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 20, 2023
केकेआरने हंगामातील सुरुवातीच्या 13 पैकी 6 सामने जिंकले होते. संघ 12 गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर होता. अशात प्लेऑफसाठी आपले आव्हान कायम ठेवायचे असेल, तर शनिवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध त्यांनी 8.5 षटकांमध्ये विजय मिळवणे आवश्यक होते. केकआरला विजयासाठी या सामन्यात 177 धावांचे आव्हान मिळाले, जे 8.5 षटकांमध्ये गाठणे शक्य झाले नाही. परिणामी सीएसके आणि गुजरात संघ क्वॉलिफायर एकसाठी पात्र ठरले.(Qualifier 1 of IPL 2023 well play in Chennai vs Gujarat in Chepauk on May 23rd.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या फिटनेसविषयी सीएसके प्रशिक्षकाची मोठी माहिती, कर्णधार धावण्यासाठी करतोय संघर्ष
दणदणीत विजयासह सीएसके थाटात प्ले ऑफ्समध्ये! दिल्लीची अखेरही पराभवाने