नागपुर। नागपुर जिल्हा हार्ड कोर्ट टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत क्वालिफायर स्मृती भसीन हिने मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवत आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.
नागपूर, रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या स्मृती भसीन हिने आठव्या मानांकित मिहिका यादवचा 6-3, 6-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. हुमेरा बहारमूस हिने क्वालिफायर कशिश भाटियाचे आव्हान 6-3, 6-4असे संपुष्टात आणले. चुरशीच्या लढतीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या युब्रानी बॅनर्जी हिने ईश्वरी माथेरेचा टायब्रेकमध्ये 6-4, 2-6, 6-7(5)असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. हा सामना 2 तास 25 मिनिटे चालला. आणखी एका अटीतटीच्या लढतीत डेन्मार्कच्या एलेना जमशेदीने भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या सुदिप्ता कुमारचा 6-2, 2-6, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली. हि लढत 2 तास 24 मिनिटे रंगली.
क्वालिफायर प्रत्युशा रचापुडी हीने अविष्का गुप्ताचे आव्हान 6-2, 5-7, 6-3 अशा फरकाने 2 तास 38 मिनिटात मोडीत काढले. या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी मिळून सर्व्हिस करताना 21 डबल फॉल्ट केले. चौथ्या मानांकित थायलंडच्या पुनीन कोवापिटूटेड हिने महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तूरेला 7-6(3), 6-1 असे पराभूत केले. हा सामना 1 तास 33 मिनिटे चालला.
दुहेरीत पहिल्या फेरीत श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्तीने समा सात्विकाच्या साथीत शर्मदा बाळू व श्राव्या शिवानी चिल्कापुडी या चौथ्या मानांकित जोडीचा 7-6(4), 6-2 असा पराभव करून पुढच्या फेरीत आगेकूच केली. याआधी स्पर्धेचे उदघाटन राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके, नगरसेविका डॉ. प्रणिती फुके, एमएसएलटीएचे आजीव अध्यक्ष शरद कन्नमवार, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, एनडीएचटीएचे अध्यक्ष कुमार काळे, एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, एनडीएचटीएचे सदस्य दर्शन दक्षिणदास, अशोक भिवापूरकर, राजन नायर आदी मान्यवर उपस्थित होते. एमएसएलटीएचे खजिनदार व स्पर्धेचे संचालक सुधीर भिवापूरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर विक्रम नायडू यांनी उपस्थितांचे आभार मानले.
निकाल: एकेरी गट: महिला: पहिली फेरी:
युब्रानी बॅनर्जी(भारत)वि.वि.ईश्वरी माथेरे(भारत)6-4, 2-6, 6-7(5);
सहजा यमलापल्ली(भारत)वि.वि.श्राव्या शिवानी चिल्कापुडी(भारत)6-1, 6-0;
पुनीन कोवापिटूटेड(थायलंड)[4] वि.वि.आकांक्षा नित्तूरे(भारत)7-6(3), 6-1;
जेनिफर लुईखेम(भारत)[6] वि.वि.आरती मुनियन(भारत)6-0, 6-2;
एलेना जमशेदी(डेन्मार्क)वि.वि.सुदिप्ता कुमार(भारत)6-2, 2-6, 6-4;
स्मृती भसीन(भारत)वि.वि.मिहिका यादव(भारत)[8] 6-3, 6-1;
हुमेरा बहारमूस(भारत)वि.वि.कशिश भाटिया(भारत)6-3, 6-4;
प्रत्युशा रचापुडी(भारत)वि.वि. अविष्का गुप्ता(भारत)6-2, 5-7, 6-3;
दुहेरी:
साई संहिता चमर्थी(भारत)/सोहा सादिक(भारत) वि.वि.सारा गजभिये(भारत)/साई देदीप्या येडुला(भारत) 6-0, 6-0;
श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती(भारत)/समा सात्विका(भारत)वि.वि.शर्मदा बाळू(भारत)/श्राव्या शिवानी चिल्कापुडी(भारत)[4] 7-6(4), 6-2;
दक्षता पटेल(भारत)/ईश्वरी माथेरे(भारत)वि.वि.स्नेहल माने(भारत)/आकांक्षा नित्तूरे(भारत)6-2, सामना सोडून दिला;
निधी चिलूमुला(भारत)/सौम्या विज(भारत)[3]वि.वि.सुदिप्ता कुमार(भारत)/रिया उबवेजा(भारत)6-3, 6-1;
महत्त्वाच्या बातम्या –
चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन चार्जर्स व टायगर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत
आर्यन पम्प्स एमएसएलटीए १५०००डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धा: भारताच्या झील देसाई हिला अग्रमानांकन
पीवायसीच्या वतीने स्नूकरसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित