पुणे। फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एमएसएलटीए चॅम्पियनशीप सिरीज 12वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात अभिर सिधु सिंग, रुद्र मेमाणे, पृथ्वीराज दुधाने यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अभिर सिधु सिंग याने अव्वल मानांकित धीयान पटेलचा 6-3, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. रुद्र मेमाणे याने पंधराव्या मानांकित नील बोन्द्रेचा 6-0, 6-3 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. चुरशीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित अझलन शेखने आश्रित मज्जीचा 1-6, 6-3, 7-6(2) असा तर, चौथ्या मानांकित आहान पाटीलने नवव्या मानांकित शुभ नाहाटाचा टायब्रेकमध्ये 6-3, 3-6, 7-6(1) असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली. सहाव्या मानांकित पृथ्वीराज दुधाने याने तनिश पाटीलला 7-5, 6-2 असे पराभूत केले.
निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:
अभिर सिधु सिंग वि.वि.धीयान पटेल[1] 6-3, 6-4;
अझलन शेख[2]वि.वि.आश्रित मज्जी 1-6, 6-3, 7-6(2);
आहान पाटील[4]वि.वि.शुभ नाहाटा[9] 6-3, 3-6, 7-6(1);
युगंधर शास्त्री[3]वि.वि.राघव अगरवाल 6-2, 4-6, 6-4;
नीरज जोर्वेकर[5] वि.वि.वेदांत जोशी[13] 6-0, 6-1;
पृथ्वीराज दुधाने[6]वि.वि.तनिश पाटील 7-5, 6-2;
रुद्र मेमाणे वि.वि.नील बोन्द्रे[15] 6-0, 6-3;
आरुष पोतदार वि.वि.सिद्धार्थ कोंढाळकर 6-1, 6-0.
महत्त्वाच्या बातम्या –
‘सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या, पण…’ अनेक विक्रम तोडूनही बटलर ‘या’ कारणाने निराश
IPL 2022मध्ये सगळ्यात जास्त धावा करूनही बटलर निराश, अंतिम सामन्यात फेकून दिले हेल्मेट, पाहा Video