---Advertisement---

रोहित-हार्दिकच्या फिटनेसवर टांगती तलवार! अफगाणिस्तान वनडे मालिकेपूर्वी बीसीसीआयचा कडक इशारा

On: मंगळवार, जून 2, 2026 7:41 PM
---Advertisement---

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात 14 जूनपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होत आहे. मात्र, या मालिकेपूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma & Hardik pandya) आणि हार्दिक पांड्या यांच्या फिटनेसबाबत शंका निर्माण झाली आहे. बीसीसीआयने या दोघांनाही ‘सेंटर ऑफ एक्सीलेंस’ (COE) मध्ये रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. आपली फिटनेस सिद्ध केल्यानंतरच ते आगामी वनडे मालिकेत खेळू शकतील.

हार्दिक पांड्याला भारतीय संघात निवडतानाच ‘फिटनेस’ची अट घालण्यात आली होती. पूर्णपणे फिट असल्याचे सिद्ध झाल्यावरच त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल. बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, हार्दिकला पुढील एक आठवडा सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये घालवावा लागेल, जिथे तो फिटनेस सराव आणि मॅच सिम्युलेशनमधून जाईल. हार्दिकला पाठीच्या स्नायूंच्या दुखापतीचा (Muscle spasm) त्रास आहे, ज्यामुळे तो आयपीएल 2026 मधील काही सामन्यांतून बाहेर होता. त्याने शेवटचा वनडे सामना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता.

केवळ हार्दिकच नाही, तर रोहित शर्मालाही बीसीसीआयने फिटनेसबाबत इशारा दिला आहे. आयपीएल 2026 दरम्यान रोहितला ‘हॅमस्ट्रिंग’च्या दुखापतीमुळे काही सामन्यांतून बाहेर बसावे लागले होते. यामुळेच, वनडे संघाची घोषणा करताना त्याच्या नावापुढे ‘फिटनेसवर आधारित’ (Subject to fitness) असे नमूद करण्यात आले होते. म्हणजेच, आपली मॅच फिटनेस सिद्ध केल्यानंतरच रोहित प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकेल.

अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय वनडे संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, प्रिंस यादव, गुरनूर बराड आणि हर्ष दुबे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---