ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ मागील दीड वर्षापासून शानदार कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याला पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार करावे असे अनेकांचे मत आहे. आता याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठे विधान केले आहे.
खरंतर स्मिथ मार्च 2018 पर्यंत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. मात्र दक्षिण आफ्रिकेत 2018 साली झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणामुळे त्याला कर्णधारपद सोडावे लागले होते. या प्रकरणामुळे त्याच्यावर एक वर्ष क्रिकेट खेळण्याची बंदी होती. तसेच दोन वर्षे त्याला नेतृत्व स्विकारता येणार नव्हते. या प्रकरणानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टीम पेनकडे कसोटी संघाचे तर ऍरॉन फिंचकडे मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व दिले होते.
पण स्मिथच्या या बंदीचा कालावधी पूर्ण झाला असून तो जवळपास गेल्या दीड वर्षापासून तो चांगले प्रदर्शन करत आहे. त्यामुळे स्मिथला पुन्हा कसोटी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (सीए) म्हणणे आहे की काही शानदार युवा खेळाडू पुढे येत आहेत. ते देखील कर्णधारपदासाठी दावेदार असतील.
याबद्दल बोलताना सीएचे चेअरमन अर्ल एडिंग्स म्हणाले, “सगळ्यात पहिल्यांदा तर आमच्याकडे मेग, एराॅन आणि टीम पेन यांच्या रूपाने तीन शानदार कर्णधार आहेत. काही दमदार युवा कर्णधार समोर येत आहेत. कर्णधारपद हे केवळ स्टीव्ह स्मिथशी जोडले नाही, तर हे एकूण सर्वश्रेष्ठ खेळाडूला जबाबदारी देण्याशी जोडले आहे. स्टीव्ह युवा आहे आणि जेव्हा पर्यंत जबाबदारी सांभाळत होता त्याने चांगली कामगिरी केली होती. कोणत्याही उत्तराधिकाऱ्यासाठी योजनेची गरज असते. पुढच्या कर्णधारासाठी एक बोर्ड म्हणून आम्ही कोणतीही विशिष्ठ बैठक घेतलेली नाही.”
एडिंग्स म्हणाले की सीएने मागील काही वर्षात विविध खेळाडूंना उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवली होती आणि जेव्हा पेनचा उत्तराधिकारी म्हणून निवडण्याची वेळ येईल, तेव्हा आम्ही निवड समितीच्या शिफारशींवर विचार करू. पेन कसोटी आणि एराॅन फिंच मर्यादित षटकांच्या सामन्यांचे प्रभावीपणे नेतृत्व करत आहे. अशात सीए नव्या नेतृत्वाबद्दल प्रतीक्षा करू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ दिग्गज खेळाडूशिवाय पाकिस्तान खेळणार न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामना
भन्नाटच! न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूने घेतला अचंबित करणारा एकहाती झेल; व्हिडिओ व्हायरल