टी20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशचा डाव सुरू असताना असं काहीतरी घडलं, ज्यामुळे बांगलादेशी चाहते चांगलेच संतापले. पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे कदाचित सामन्याच्या दिशेवरही परिणाम झाला.
टी20 विश्वचषकात रविवारी (दि. 6 नोव्हेंबर) पाकिस्तान आणि बांगलादेश (Pakistan vs Bangladesh) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर 5 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, संघ मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही आणि 8 गडी गमावत 127 धावाच करू शकला. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने दमदार प्रदर्शन करत 4 गडी बाद केले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने 5 गड्यांच्या मोबदल्यात 128 धावा करत सामना जिंकला. हा सामना जिंकून पाकिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली. रविवारी दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सच्या हातून पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या पंचांच्या एका निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्या बॅटला चेंडू लागलेला असताना देखील त्याला पायचीत बाद देण्यात आले. या निर्णयामुळे पंचांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हे निर्माण करण्यात आले. बांगलादेशच्या डावातील 11वे षटक फिरकीपटू शादाब खान हा टाकत होता. त्याने चौथ्या चेंडूवर सौम्य सरकार याला 20 धावांवर बाद केले. त्यानंतर शाकिब मैदानात उतरला. त्याला पहिल्याच चेंडूवर पायचीत बाद देण्यात आले. पंचांच्या निर्णयावर विश्वास न बसल्याने त्याने डीआरएसची मागणी केली. मात्र, टीव्ही पंचांनी त्याला बाद घोषित केले.
Big moment in the match. Looked like Shakib Al Hasan edged it.
The umpiring in this tournament hasn't been great#T20WorldCup #PAKvBAN pic.twitter.com/4zoJcVVPkm
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) November 6, 2022
https://twitter.com/Pritam1712/status/1589121052898398209
https://twitter.com/SaiGiridhar14/status/1589121461771698178
याआधी देखील झालाय वाद
याआधी देखील टी20 विश्वचषकाच्या सध्याच्या हंगामात पंचांच्या बऱ्याच निर्णयावर प्रश्नचिन्हे निर्माण केली गेली आहेत. ऑस्ट्रेलिया आणि अफगणिस्तान यांच्यातील सामन्यात पंचांनी फक्त 5 चेंडूवर षटक घोषित केले. यावर सामन्यानंतर माध्यमांनी आक्षेप घेतला. दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात 20व्या षटकात ‘नो बॉल’च्या मुद्द्यावरून वाद झाला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्यांना चाहते मानायचे आदर्श, त्याच खेळाडूंनी केली होती हद्द पार; सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने लागलेली वाट
पाकिस्तानात माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेचे वांदे, आशिया चषकासाठी भारतीय संघाला न पाठवण्याची होतेय मागणी