सध्या भारत आणि वेस्ट इंडिज हो दोन संघ ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहेत. या मालिकेत प्रथमच भारताने सुर्यकुमार यादववर सलामीवीर म्हणून खेळण्याची जबाबदारी दिली आहे. अशात पहिल्या दोन सामन्यात फेल ठरल्यानंतर सुर्यकुमारने तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत भारताला विजय मिळवून दिला. मात्र, संघात चौथ्या क्रमांकावर खेळत असल्या श्रेयस अय्यरच्या निवडीबाबत अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केले जात आहेत.
श्रेयस अय्यरला आणखी किती संधी मिळणार?
श्रेयस अय्यर वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी मालिकेत लवकर बाद होताना दिसला होता. शॉर्ट बॉल्ससमोर त्याची कमजोरी संपण्याचे नाव घेत नाहीये. श्रेयस अय्यरने ३ सामन्यांच्या मालिकेत दोन अर्धशतके झळकावत वेस्ट इंडिज दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आपल्या खेळात चांगला दिसला. पण टी-२० मालिकेचा भाग बनताच श्रेयस पुन्हा त्याच्या जुन्या अवतारात दिसणार आहे. फरक इतकाच की पहिल्या सामन्यात श्रेयस शून्यावर बाद झाला होता. भारतीय संघाचे सलामीवीर लवकर आपली विकेट गमावतात, , त्यामुळे संघाला श्रेयस अय्यरची खूप गरज होती, परंतु तो लवकर विकेट गमावताना दिसला. श्रेयस अय्यर शॉर्ट बॉलसमोर आऊट होताना दिसत आहे. त्यानंतर त्याच्या संघातील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ईशान किशन, दीपक हुडा आणि संजू सॅमसन सारख्या मोठ्या खेळाडूंनाही बीसीसीआय व्यवस्थापनाकडून संघात संधी दिली जात आहे. फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये असतानाही संघ व्यवस्थापनाकडून श्रेयस अय्यरला पुन्हा पुन्हा पाठींबा मिळत आहे. त्यामुळे इतर खेळाडूंच्या प्रतिभेला डावलण्याचा आरोप बीसीसीआय निवडकर्त्यांवर केला जात आहे.
श्रेयस अय्यरऐवजी या खेळाडूंना पुढील सामन्यात संधी मिळू शकते
श्रेयस अय्यरला टी-२० फॉरमॅटमध्ये मिळत असलेल्या संधींचे पालन करण्यात अपयश येत आहे. बॅकअपसाठी भारताकडे एकापेक्षा जास्त फलंदाज आहेत. श्रेयस अय्यर वेस्ट इंडिज दौऱ्यातील सलग दोन टी-२० सामन्यांमध्ये खराब कामगिरी करताना दिसत आहे, त्यानंतर संघाने आता त्याला संधी देऊन दुसऱ्याला आजमावले पाहिजे. सध्या संघाकडे इशान किशन आणि संजू सॅमसनसारखे मोठे फलंदाज आहेत, जे उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावा करत आहेत. या खेळाडूंना पुढील सामन्यादरम्यान संधी मिळेल असे वाटते. चांगल्या फॉर्ममध्ये असूनही या खेळाडूंवर अन्याय होताना दिसत आहे.
श्रेयस अय्यरमध्ये प्रतिभेची कमतरता नव्हती. यावेळी संघाने अशा खेळाडूंना संधी द्यावी जे भविष्यात आपला फॉर्म कायम राखू शकतील, त्याचा संघासाठी उपयोग करून घ्यावा. टी-२० मालिकेतील चौथा सामना ६ ऑगस्टरोजी खेळवला जाणार आहे. जर संघाला बदलासोबत जायचे असेल तर मोठा बदल श्रेयस अय्यर असेल. आणि त्याच्या जागी संघात इशान किशन किंवा संजू सॅमसनचा समावेश केला जाऊ शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टी२० विश्वचषकात ‘हे’ ३ वेगवान गोलंदाज ठरणार हुकुमी एक्के, माजी प्रशिक्षकाची छातीठोक भविष्यवाणी
हॉकीच्या मॅचदरम्यान खेळाडूंमध्ये रंगली कुस्तीची लढत, मारहाणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल
कसलं भारी ना! दिनेश कार्तिकच्या पत्नीशी कांस्य पदक विजेत्या सौरव घोषालचे आहे जवळचे नाते