---Advertisement---

शमीनंतर असा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह दुसराच भारतीय गोलंदाज!

On: शनिवार, जुलै 6, 2019 7:29 PM
---Advertisement---

लीड्स। आज(6 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध श्रीलंका संघात 44 वा सामना सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 264 धावा केल्या आहेत. भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत.

याबरोबरच बुमराहने वनडेमध्ये 100 विकेट्सचा टप्पाही पार केला आहे. हा टप्पा त्याने 57 व्या वनडे सामन्यात खेळताना पूर्ण केला आहे. त्यामुळे तो वनडेमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय गोलंदाज ठरला आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने बुमराहची 100 वी विकेट ठरला आहे.

वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर मोहम्मद शमी आहे. शमीने 56 सामन्यात 100 वनडे विकेट्सचा टप्पा गाठला होता.

तसेच बुमराह वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा जगातील सातव्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर अफगाणिस्तानचा राशीद खान असून त्याने हा टप्पा 44 सामन्यातच पूर्ण केला होता.

बुमराहच्या वनडेमध्ये आता 57 सामन्यात 21.71 च्या सरासरीने 102 विकेट्स झाल्या आहेत.

#वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज – 

56 सामने – मोहम्मद शमी

57 सामने – जसप्रीत बुमराह

59 सामने – इरफान पठाण

65 सामने – झहीर खान

67 सामने – अजीत अगरकर

68 सामने – जवागल श्रीनाथ

#वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे गोलंदाज – 

44 सामने – राशीद खान

52 सामने – मिशेल स्टार्क

53 सामने – साक्लेन मुश्ताक

54  सामने – शेन बॉन्ड, मुस्तफिजूर रेहमान

55 सामने – ब्रेट ली

56 सामने – ट्रेट बोल्ट, मोहम्मद शमी

57 सामने – जसप्रीत बुमराह

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकात टीम इंडियाच्या बाबतीत असे पहिल्यांदाच झाले

टीम इंडियाची सुपरफॅन आजी आज पून्हा मैदानात!

धोनीने मौन सोडले; निवृत्तीबद्दल केले मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment