---Advertisement---

त्या यादीत आता १८ वर्षीय यशस्वी जयस्वालचे नाव सन्मानाने घेतले जाणार

On: रविवार, जानेवारी 19, 2020 5:16 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या 19 वर्षांखालील विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकात आज(19 जानेवारी) भारताचा पहिला सामना 19 वर्षांखालील श्रीलंका संघाविरुद्ध सुरु आहे. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने अर्धशतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.

त्याने या सामन्यात 74 चेंडूत 59 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 8 चौकार मारले आहेत. याबरोबरच त्याचे युवा वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावाही पूर्ण झाल्या आहेत. त्याने 22 व्या वनडे डावात हा पराक्रम केला आहे.

त्यामुळे तो युवा वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याच्या यादीत शुबमन गिल आणि उन्मुक्त चंद नंतर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.

जयस्वालचे आता युवा वनडे क्रिकेटमध्ये 22 डावात 58.05 च्या सरासरीने 1045 धावा झाल्या आहेत. यात त्याच्या 2 शतकांचा आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

युवा वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम शुबमन गिलच्या नावावर आहे. त्याने 13 डावात हा पराक्रम केला होता. तर दुसऱ्या क्रमांकावर उन्मुक्त चंद असून त्याने 17 डावात युवा भारतीय संघाकडून खेळताना 1000 धावा केल्या होत्या.

युवा वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारे फलंदाज –

13 डाव – शुबमन गिल

17 डाव – उन्मुक्त चंद

22 डाव – यशस्वी जयस्वाल

https://twitter.com/Maha_Sports/status/1218851211320807424

https://twitter.com/Maha_Sports/status/1218829593106243584

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---