पुढील वर्षी सुरु होत असलेल्या दक्षिण आफ्रिका टी20 लीगची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. खेळाडूंच्या लिलावानंतर आता सर्व संघांनी आपले कर्णधार देखील घोषित करण्यास सुरुवात केली आहे. डर्बन सुपरजायंट्सने या स्पर्धेच्या पहिल्या हंगामासाठी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी सलामीवीर क्विंटन डी कॉक याची नियुक्ती केली. त्यांनी याची नुकतीच अधिकृत घोषणा केली.
https://www.instagram.com/p/ClgRP2PjqJF/?igshid=YmMyMTA2M2Y=
दक्षिण आफ्रिका टी20 लीगमधील सर्व सहा संघांची मालकी ही आयपीएलमधील फ्रॅंचायजीने घेतली आहे. डर्बन फ्रॅंचायजी भारतीय उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालकीचे असून, आयपीएलमध्ये ते लखनऊ सुपरजायंट्स संघाचे मालक आहेत. या हंगामासाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-सलामीवीर क्विंटन डी कॉक याला कर्णधार म्हणून घोषित केले. डी कॉक हा आयपीएलमध्ये देखील लखनऊ सुपरजायंट्सचे प्रतिनिधित्व करतो.
डर्बन सुपरजायंट्सने फ्रॅंचायजी विकत घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू लान्स क्लुजनर यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर नुकतेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून सपोर्ट स्टाफमध्ये स्थान दिले आहे.
खेळाडूंच्या लिलावाआधी डर्बन सुपरजायंट्सने डी कॉक, जेसन होल्डर, कायले मायर्स, रिस टोप्ली व प्रीनलेन सुब्रेयन यांना करारबद्ध केले होते. त्यांनी लिलावात आणखी खेळाडूंना खरेदी करत आपला मजबूत संघ उभा केला आहे. सहा संघांच्या या स्पर्धेत या स्पर्धेत 33 सामनेे आयोजित करण्यात येणार आहेत, ज्याचा अंतिम सामना जोहान्सबर्ग येथील ऐतिहासिक मैदान ‘द वंडरर्स’ येथे खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेत पुन्हा खेळवल्या जाणाऱ्या या मोठ्या टी20 लीगचा पहिला हंगाम देशभरात 6 ठिकाणी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचे मालकी हक्क आणि स्पर्धेचे स्वरुप आयपीएलसारखेच असणार आहेे.
(Quinton de Kock Appointed As Durban Supergiants Captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिलदार ऋतुराज! स्वतःचा सामनावीर पुरस्कार राजवर्धनला देत जिंकली सर्वांची मने
पाकिस्तानात खेळायचा एक रुपयाही घेणार नाही स्टोक्स! कारण वाचून कराल कौतुक