क्रिकेटविश्वात सध्या कसोटी मालिकांचा थरार चालू आहे. एकीकडे भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर उभय संघात २ सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
यानंतर सेंट लुसीया येथे दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना चालू असताना तिसऱ्या दिवसाखेर (२० जून) वेस्ट इंडिजला विजयासाठी ३०९ धावा करायच्या आहेत. या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने एक आगळावेगळा विक्रम केला आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने गोलंदाजी निवडली आणि दक्षिण आफ्रिकाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना डी कॉकचे अर्धशतक थोडक्यात हुकले. तो १६२ चेंडूंमध्ये ८ चौकारांच्या मदतीने ९६ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. २ चेंडूंचा सामना करत शून्य धावेवर तो पव्हेलियनला परतला.
तत्पुर्वी पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने नाबाद १४१ धावांची धुव्वादार खेळी केली होती. १७० चेंडू खेळताना ७ खणखणीत षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या उभारली होती. अशाप्रकारे एखाद्या कसोटी मालिकेतील सलग ३ डावांमध्ये शतक, अर्धशतक आणि शून्य धावा करण्याचा अनोखा विक्रम त्याने नोंदवला आहे. त्याच्याआधी कोणत्याही फलंदाजाला हा किर्तीमान करता आला नाही. (Quinton De Kock Become First Batsman To Score Century, Half Century And Duck In Consecutive 3 Test Innings)
दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात यजमान संघ ६ षटकांनंतर १५ धावांवर आहे. त्यांना अजून पाहुण्यांच्या ३०९ धावांचे लक्ष्य गाठायचे आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट नाबाद ५ धावा आणि सलामीवीर कायरन पॉवेल ९ धावांवर खेळत आहे. अशात वेस्ट इंडिज संघ हा सामना जिंकत मालिका बरोबरीवर आणण्यात यशस्वी ठरतो की नाही? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
जाळ अन् धूर संगटच! स्म्रीतीच्या फोटोवर कोट्यावधी चाहते घायाळ; म्हणे, ‘अभिनेत्रीहूनही सुंदर’
‘इंग्लंडच्या खेळाडूंनी हात धुवून डिवचलं, पण मला फरक पडला नाही,’ भारताच्या अष्टपैलूची प्रतिक्रिया
चित्याहूनही जास्त चपळ! हवेत उडी मारत अगदी क्षणभरात कोहलीने पकडला एकहाती कॅच