4 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी काल(21 जानेवारी) दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
या वनडे संघाचे कर्णधारपद यष्टीरक्षक फलंदाज क्विंटॉन डी कॉककडे सोपवण्यात आले आहे. आता तोच फाफ डू प्लेसिस ऐवजी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असणार आहे. डू प्लेसिसला इंग्लंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी संघात स्थानही देण्यात आलेले नाही.
दक्षिण आफ्रिकेने डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली 39 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 28 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. तसेच 10 सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. तर 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.
BREAKING: Quinton de Kock has been named as South Africa's new ODI captain 👏 pic.twitter.com/oeZM8d84Zc
— ICC (@ICC) January 21, 2020
तसेच इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात 5 युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये लूथो सिपम्ला, जानेमन मलान, बिजॉर्न फॉर्च्यून, काईल वेरिन आणि सिसांडा मगला यांना संधी दिली आहे. यातील एकाही खेळाडूचे वनडे पदार्पण झालेले नाही.
त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या या संघात वेगवान गोलंदाज लूंगी एन्गिडीचे पुनरागमन झाले आहे.
डीकॉकला कर्णधार करण्याबद्दल क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे संचालक ग्रॅमी स्मिथ म्हणाले की, ‘क्विंटन हा एक उत्तम खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांत तो जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज म्हणून समोर आला आहे. या व्यतिरिक्त तो उत्तम रणनीती बनवू शकतो. आम्हाला विश्वास आहे की कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याचा खेळ आणखी सुधारेल आणि तो संघाला नवीन उंचीवर नेऊ शकेल.’
इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ –
क्विंटन डी कॉक (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, टेंबा बावूमा, रस्सी व्हॅन डर दसन, डेव्हिड मिलर, जॉन जॉन स्मट्स, अॅन्डिल फेहलुक्वायो, लुथो सिपम्ला, लुंगी एन्गिडी, ताब्राइज शम्सी, सिसांडा मगला, बिजॉर्न फॉर्च्यून, ब्युरान हेंड्रिक्स, जानेमन मलान, काईल वेरिन
अखेर प्रतिक्षा संपली! सचिन झाला कोच
वाचा👉https://t.co/5EvkrH5ktS👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @sachin_rt— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
मुंबईकर पृथ्वी शॉ भारताच्या वनडे संघात; धवनऐवजी टी२०साठी या खेळाडूची झाली निवड
वाचा👉https://t.co/IazJY0aMsS👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @PrithviShaw— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020