नुकताच भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) संपला आहे. पाहुण्या भारतीय संघाला मात्र या दौऱ्यावर खास कामगिरी करता आली नाही. उभय संघांमध्ये केपटाऊन येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने शेवटपर्यंत विजयासाठी चिवट झुंज दिली. परंतु केवळ ४ धावांच्या फरकाने त्यांना हा सामना गमवावा लागला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा खरा नायक ठरला, क्विंटन डी कॉक (Quinton De Kock). या यष्टीरक्षक फलंदाजाने या सामन्यात खणखणीत शतक (Quinton De Kock Century) झळकावले. तो बाद झाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी त्याच्याप्रती खेळाडूवृत्ती (Spirit Of Cricket)दाखवत सर्वांची मने जिंकली आहेत.
त्याचे झाले असे की, सलामीला फलंदाजीला येत डी कॉकने शानदार प्रदर्शन केले. त्याने रासी वॅन डर ड्यूसेनसोबत मिळून शतकी भागिदारी तर केली. सोबतच कारकिर्दीतील १७ वे वनडे शतकही झळकावले. पुढे ३६ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने शिखर धवनच्या हातून त्याला झेलबाद केले. अशाप्रकारे १३० चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने १२४ धावा करून त्याच्या मॅरेथॉन खेळीवर पूर्णविराम लागला.
व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener
डी कॉक शतक करून बाद झाल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी त्याचे कौतुक केले. त्याची विकेट घेणाऱ्या बुमराहनेच त्याची पाठ थोपटली. त्यानंतर भारताचा कर्णधार केएल राहुल यानेही त्याच्याशी हात मिळवत त्याला शतकी खेळीसाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय खेळाडूंची ही खेळाडूवृत्ती चाहत्यांना मात्र खूप भावली आहे. बीसीसीआयनेही राहुलचा डी कॉकशी हात मिळवतानाचा फोटो शेअर करत त्याच्या खेळ भावनेचे कौतुक केले आहे.
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1485223295339610112?s=20
A touch of class from #TeamIndia captain @klrahul11 to appreciate Quinton de Kock's fine batting effort 🤜🤛 #SAvIND #SpiritOfCricket pic.twitter.com/Sn1Spul4PT
— BCCI (@BCCI) January 23, 2022
दरम्यान या शतकासह डी कॉकने विक्रमांचे रतीब घातले आहे. त्याने या सामन्यात केलेले विक्रम खालीलप्रमाणे-
भारताविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके करणारे फलंदाज.
१. सनथ जयसूर्या (८५ डाव) – ७ शतके
२. क्विंटन डी कॉक (१६ डाव) – ६ शतके*
३. एबी डिविलियर्स (३२ डाव) – ६ शतके
४. रिकी पॉंटिंग (५९ डाव) – ६ शतके
५. कुमार संगकारा (७१ डाव) – ६ शतके
एका संघाविरुद्ध सर्वात कमी डावांमध्ये ६ शतक करणारे फलंदाज
१. क्विंटन डी कॉक – दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत (१६ डाव)*
२. विरेंद्र सेहवाग – भारत विरुद्ध न्यूझीलंड (२३ डाव)
३. एरॉन फिंच – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (२३ डाव)
४. सईद अन्वर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (२६ डाव)
एका संघाविरुद्ध सर्वात कमी डावांमध्ये १००० एकदिवसीय धावा करणारे फलंदाज
१. हाशिम आमला – दक्षिण अफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज (१४ डाव)
२. व्हिव्ह रिचर्ड्स – वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड (१५ डाव)
३. स्टीव स्मिथ – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (१६ डाव)
४. क्विंटन डी कॉक – दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत (१६ डाव)*
महत्त्वाच्या बातम्या-
ऋतुराजवर अन्याय झालाय?, जबर फॉर्ममध्ये असूनही खेळण्याची संधी न दिल्याने भडकले भारतीय चाहते
पप्पा विराटची झेरॉक्स कॉपी आहे ‘वामिका’, तिसऱ्या वनडेदरम्यान दिसली पहिली झलक; तुम्हीही बघा
सेफ हँड्स! क्षेत्ररक्षणात विराटचे दमदार प्रदर्शन, २ अप्रतिम कॅच घेत ‘या’ मातब्बर फिल्डरला पछाडले
हेही पाहा-