आयपीएल २०२२मधील ६६वा साखळी फेरी सामना क्विंटन डी कॉक याने गाजवला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या या सामन्यात डी कॉकने शतक झळकावले. हे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक होते. या शतकासह त्याने विक्रमांचे मनोरे रचले आहे. दरम्यान एका खास यादीतही त्याने आपल्या नावाची नोंद केली आहे.
कर्णधार केएल राहुलला साथीला घेत डी कॉकने (Quinton De Kock Century) संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. अवघे ३६ चेंडू खेळताना त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढेही आपली फटकेबाजी सुरू ठेवत त्याने केवळ ५९ चेंडूंमध्ये शतकाला गवसणी घातली. शतक झळकावल्यानंतरही त्याने आपल्या फलंदाजीचा वेग कमी केला नाही. त्याने पुढेही आक्रमक फलंदाजी सुरू ठेवत डावाखेर नाबाद १४० धावा फटकावल्या. ७० चेंडू खेळताना १० षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने या धावा केल्या.
ही त्याची आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (Highest individual score in the IPL) आहे. यासह आयपीएल इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारा तो ख्रिस गेल आणि ब्रेंडन मॅक्यूलमनंतर केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. गेल सर्वाधिक नाबाद १७५ धावांसह या यादीत अव्वलस्थानी आहे. त्याने २०१३ साली पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध ६६ चेंडूत नाबाद १७५ धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर आयपीएल २००८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध नाबाद १५८ धावा चोपणारा ब्रेंडन मॅक्यूलम दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तसेच डी कॉकने आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळींच्या विक्रमात एबी डिविलियर्स आणि केएल राहुल यांना मागे टाकले आहे. डिविलियर्स आणि राहुलने अनुक्रमे नाबाद १३३ धावा व नाबाद १३२ धावा केल्या होत्या.
आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या:
१७५* – २०१३, ख्रिस गेल विरुद्ध पुणे
१५८* – २००८, ब्रेंडन मॅक्यूलम विरुद्ध आरसीबी
१४०* – २०२२, क्विंटन डी कॉक विरुद्ध केकेआर
१३३* – २०१५, एबी डिविलियर्स विरुद्ध मुंबई
१३२* – २०२०, केएल राहुल विरुद्ध आरसीबी
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एकमेवाद्वितीय केएल राहुल, सलग पाचव्या आयपीएल हंगामात ५०० धावा चोपत बनवला वर्ल्ड रेकॉर्ड
क्लास क्लास क्लास…! क्विंटन डी कॉकचे केकेआरविरुद्ध अवघ्या ५९ चेंडूत शतक
रोहितच्या भन्नाट षटकारानंतर पत्नी रितीकाची खुलली कळी, सारानेही टाळ्या वाजवत केलं कौतुक