दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक लवकरच वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. त्याआधी डी कॉक भारतात पार पडणाऱ्या वनडे विश्वचषकात दक्षिण आफ्रिका संघासाठी अखेरचे काही वनडे सामने खेळताना दिसले. डी कॉक याच्या कारकिर्दीतील हा तिसरा वनडे विश्वचषक असेल. आफ्रिकी संघासाठी नक्कीच अनुभवी यष्टीरक्षक फलंदाजांची विश्वचषकातील भूमिका महत्वाची ठरू शकते.
क्विंटन डी कॉक याने 2012 मध्ये दक्षिण आफ्रिका संघासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. हा सामना न्यूझीलंडविरुद्ध असून टी-20 फॉरमॅटमध्ये होता. वनडे क्रिकेटमधील पदार्पण देखील डी कॉकने न्यूझीलंडविरुद्धच 2013 मध्ये केले. त्यानंतर 2014 साली यष्टीरक्षक फलंदाजाला आपला पहिला कसोटी सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. कसोटी क्रिकेटमधून डी कॉक याने 2021 मध्ये तडकाफडकी निवृत्ती घेतली होती. यावर्षी वनडे विश्वचषक संपल्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेच्या वनडे जर्सीत पुन्हा कधीच दिसणार नाहीये. असात चाहत्यांमध्ये त्याला विश्वचषक खेळताना पाहण्यासाठी अधिक आकर्षण आहे.
2015 विश्वचषकातील प्रदर्शन –
2014 मध्ये वनडे क्रिकेट खेळायला सुरुवात करणाऱ्या डी कॉकला अवघ्या एक वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर 2015 विश्वचषकासाठी निवडले गेल. पण दुखापतीच्या कारणास्तव त्याला या हंगामात आठवणी तयार करता आल्या नाहीत. अवघ्या आठ सामन्यांमध्ये त्याने फलंदाजी केली आणि त्यातील एकामध्ये अर्धशतक केले होते. हंगामातील एकूण दोन सामन्यांमध्ये डी कॉकला 20 पेक्षा अधिक धावांचे योगदान देता आले होते. एकूण 145 धावा डी कॉकने या हंगामात केल्या होत्या. तसेच यष्टीरक्षकाच्या भूमिकेत त्याने 2015 विश्वचषकात एकूण 10 खेळाडूंना बाद केले होते.
2019 विश्वचषकातील प्रदर्शन –
आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेचा हा 12 वा हंगाम असून डी कॉकचे यातील प्रदर्शन काहीसे समाधानकारक म्हणता येईल. त्याने हंगामातील 9 सामन्यांमध्ये 38.12च्या सरासरीने आणि 86.89च्या स्ट्राईक रेटने 305 धावा केल्या होत्या. यादरम्यान तीन सामन्यांमध्ये डी कॉकने अर्धशतकी खेळी केली होती. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत डी कॉकने या हंगामात 9 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. 78* ही त्याची विश्वचषकातील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे, जी डी कॉकने 2015 विश्वचषकात सिडनीविरुद्ध केली होती.
सध्याची कामगिरी –
नुकतीच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. क्विंटन डी कॉक याने या पाच सामन्यांमध्ये 41.20च्या सरासरीने 210 धावा केल्या. या मालिकेतील डी कॉकचे सर्वोत्तम प्रदर्शन 82 धावांचे राहिले. दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकातील आपला पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे.
वनडे कारकिर्द –
वनडे क्रिकेटमध्ये डी कॉकचा अनुभव पाहता तो विश्वचषकात विरोधी संघासाठी मोठे आव्हान ठरू शकतो. 145 वनडे सामन्यांमध्ये डी कॉकने 44.75च्या सरासरीने आणि 95.75च्या स्ट्राईक रेटने 6176 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 17 शतक आणि 30 अर्धशतक केले आहेत. (Quinton de Kock’s World Cup Stats)
महत्वाच्या बातम्या –
सोढीने संपवला दुष्काळ! 15 वर्षानंतर बांगलादेश न्यूझीलंडकडून मायदेशात पराभूत
“मी अजूनही बाबरला मेडन ओव्हर टाकू शकतो”, माजी पाकिस्तानी गोलंदाजाची खरमरीत टीका