राजस्थान रॉयल्सच्या चेन्नई सुपर किंग्जवरील विजयाचा नायक राहिला आर अश्विन. आयपीएल २०२२मधील ६८व्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने अश्विनच्या नाबाद ४० धावांच्या खेळीच्या जोरावर २ चेंडू शिल्लक ठेवून ५ विकेट्सने सामना जिंकला. अश्विनने त्याच्या शानदार खेळीदरम्यान एक जबरदस्त षटकार मारला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अश्विनने (R Ashwin) चेन्नईच्या १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १७व्या षटकादरम्यान हा षटकार ठोकला. चेन्नईकडून २२ वर्षीय प्रशांत सोलंकी हे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर अश्विनने गुडघ्यावर बसत जबरदस्त शॉट खेळला (R Ashwin Six) आणि सर्वांना चकित केले.
अश्विनने चेन्नईच्या युवा गोलंदाजाविरुद्ध आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला. त्याने प्रशांत सोलंकीच्या (Prashant Solanki) बाहेरून येणाऱ्या चेंडूवर स्लॉग स्विप शॉट खेळत चेंडूला हवेत टोलवले. त्याने मारलेल्या या शॉटचा चेंडू ९७ मीटर (R Ashwin 97 Meters Six) दूर चाहत्यांच्या गर्दीत जाऊन पडला. त्याचा हा विलक्षण षटकार वरच्या फळीतील फलंदाजालाही लाजवेल असा होता. अश्विनने या सामन्यात २३ चेंडूत नाबाद ४० धावांची मॅच विनिंग खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि २ चौकारही मारले. त्याच्या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
Ashwinnnnn🔥🔥🔥https://t.co/2i3Mq5Ub03
— Rahil sayed (@Rahilsa61575873) May 20, 2022
दरम्यान चेन्नई विरुद्ध राजस्थान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, चेन्नईकडून प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीने सर्वाधिक ९३ धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर चेन्नईने राजस्थानला १५१ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात सलामीवीर यशस्वी जयस्वालचे अर्धशतक (५९ धावा) आणि आर अश्विनच्या नाबाद ४० धावांच्या जोरावर राजस्थानने ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
यासह राजस्थानचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. आता प्लेऑफमध्ये त्यांची लढत गुजरात टायटन्सविरुद्ध होईल. उभय संघ २४ मे रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पहिल्या क्वालिफायर सामन्यात भिडतील.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
माहीची क्रेझ! चालू सामन्यादरम्यान चाहत्याची धोनीकडे धाव, मग अंपायरने केले असे काही
‘वाह भाई घर हो तो ऐसा!’ गांगुलीपूर्वी ‘या’ ४ भारतीय क्रिकेटर्सनी खरेदी केलीत आलिशान घरं
हेटमायरच्या पत्नीबद्दल विधान करून फसले गावसकर, चाहत्यांनी कॉमेंट्रीवरून हटवण्याची केली मागणी