---Advertisement---

हेटमायरच्या पत्नीबद्दल विधान करून फसले गावसकर, चाहत्यांनी कॉमेंट्रीवरून हटवण्याची केली मागणी

Sunil-Gavaskar-Shimron-Hetmyer
---Advertisement---

आयपीएल २०२२ मध्ये शुक्रवारी (२० मे) राजस्थान रॉयल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाला चांगली सुरुवात मिळाली. परंतु त्यानंतर संघाने पटापट विकेट्स गमावल्या, ज्यामुळे सामना त्यांच्या हातून निसटत चालला होता. अशात वेस्ट इंडिजचा धाकड फलंदाज शिमरॉन हेटमायर फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. यावेळी समालोचक सुनील गावसकर यांनी जे विधान केले, त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

हेटमायर (Shimron Hetmyer) त्याच्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी काही दिवसांची सुट्टी घेऊन घरी परतला होता. यामुळे तो काही सामनेही खेळू शकला नव्हता. मात्र चेन्नईविरुद्धच्या (CSK vs RR) सामन्यातून त्याने संघात पुनरागमन केले. यशस्वी जयस्वालची विकेट गेल्यानंतर हेटमायर १५व्या षटकात फलंदाजीसाठी आला होता. यादरम्यान गावसकर राजस्थान-चेन्नई सामन्याचे इंग्रजीमध्ये समालोचन करत होते.

हेटमायर फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उतरताच गावसकरांनी विधान करत म्हटले की, “शिमरॉन हेटमायरच्या पत्नीने (Shimron Hetmyer Wife) डिलीव्हर केला आहे, आता हेटमायर राजस्थानसाठी डिलीव्हर करेल का?”. गावसकरांच्या या विधानानंतर चाहते सोशल मीडियावर त्यांना फटकारत आहेत. काही चाहत्यांनी तर गावसकरांना त्यांच्या या विधानामुळे समालोचणाच्या पॅनेलमधून हटवण्याचीही मागणी केली आहे. दरम्यान हेटमायर ७ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. त्याला प्रशांत सोलंकीने डेवॉन कॉन्वेच्या हातून झेलबाद केले.

यापूर्वी अशाचप्रकारे गावसकर क्रिकेटपटूच्या पत्नीबद्दल वादग्रस्त प्रतिक्रिया देत टिकाकारांच्या निशाण्यावर आले होते. आयपीएल २०२० मध्ये त्यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माबद्दल विधान केले होते, ज्यामुळे त्यांना टिकेला सामोरे जावे लागले होते.

दरम्यान चेन्नई विरुद्ध राजस्थान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, चेन्नईकडून प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीने सर्वाधिक ९३ धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर चेन्नईने राजस्थानला १५१ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात सलामीवीर यशस्वी जयस्वालचे अर्धशतक (५९ धावा) आणि आर अश्विनच्या नाबाद ४० धावांच्या जोरावर राजस्थानने ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

धोनी पुढल्यावर्षी खेळतोय, हे समजताच गावसकरांनी दिली कोट्यवधी थालाप्रेमींच्या मनातली प्रतिक्रिया

Video : ‘२०२३मध्ये परत येतोय, तोवर हा षटकार लक्षात ठेवा’, शेवटच्या सामन्यात धोनीने मारला अफलातून सिक्स

सीझनचा शेवटचा सामनाही कसा काय गमावला? शेवटी धोनीने मनातलं उत्तर दिलं, पाहा काय म्हणाला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---