सध्या भारत विरुद्ध इंग्लंड संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत भारताचा ऑफस्पिनर आर अश्विन जबरदस्त कामगिरी करतो आहे. अश्विनच्या फिरकीच्या तालावर इंग्लंडचे सगळेच फलंदाज नाचताना दिसत आहेत. अश्विनने या मालिकेत दोन्ही संघांमधील गोलंदाजांमध्ये सर्वाधिक म्हणजेच २४ बळी घेतले आहेत.
त्याच्या याच उत्कृष्ट कामगिरीचे फळ त्याला आता मिळाले आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अश्विनने मोठी झेप घेतली आहे. अश्विनने चार स्थानांनी प्रगती करत तिसरे स्थान गाठले आहे. त्याच्या नावावर आता ८२३ रेटिंग गुण आहेत.
टॉप-१० मध्ये दोन भारतीय गोलंदाज
आयसीसीच्या या क्रमवारीत पहिल्या दहा क्रमांकात दोन भारतीय गोलंदाज आहेत. आर अश्विन तिसऱ्या स्थानी असून जसप्रीत बुमराहने देखील घसरण होऊनही पहिल्या दहा क्रमांकात स्थान टिकवण्यात यश मिळवले आहे. बुमराहची एका स्थानाने घसरण झाली असून तो आता ७४६ रेटिंग गुणांसह नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
दरम्यान, इंग्लंडचा अव्वल वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला भारताविरुद्धच्या खराब कामगिरीचा फटका बसला आहे. त्याची तीन स्थानांनी घसरण झाली असून आता तो सहाव्या स्थानी आहे. त्याचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉडची देखील घसरण झाली असून तो सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानी आला आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने अव्वल स्थान कायम राखले असून न्यूझीलंडच्या नील वॅगनरने दुसरे स्थान कायम राखले आहे.
🔸 Ashwin breaks into top three
🔸 Anderson slips to No.6
🔸 Broad, Bumrah move down one spotThe latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for bowling: https://t.co/AIR0KNm9PD pic.twitter.com/FssvpYiLcx
— ICC (@ICC) February 28, 2021
दरम्यान, सध्या भारत आणि इंग्लंडचे संघ कसोटी मालिका खेळत असून त्यांच्यातील एक कसोटी सामना अजून शिल्लक आहे. त्यामुळे आगामी ४ मार्चपासून सुरु होणाऱ्या या सामन्यानंतर या क्रमवारीत पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
कॉमेंट्रेटरने हेअरस्टाईलवर टिप्पणी करताच भडकला डेल स्टेन, ट्विट करत म्हणाला
वाढदिवस विशेष: टेम्पो चालकाचा मुलगा ते नेट बॉलर अन् आता आयपीएल गाजवण्यास सज्ज, वाचा त्याची कहाणी
युवा धुरंधरचा धुमाकूळ, षटकार-चौकारांसह विरोधकांची धोबीपछाड; ५९ चेंडूत केल्या १२८ धावा