बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन भारतीय संघाचा हिरो ठरला होता. अश्विननं या सामन्यात बॅट आणि बॉलनं महत्त्वाचं योगदान दिलं होतं.
38 वर्षीय अश्विननं पहिल्या डावात 113 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात चेंडूसह एकूण 6 बळी घेतले होते. दुसऱ्या डावात 6 विकेट घेतल्यानंतर अश्विननं दिग्गज शेन वॉर्नच्या विक्रमाची बरोबरी केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा तो संयुक्त दुसरा गोलंदाज ठरला. आता भारत बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळणार आहे. या कसोटीत अश्विनच्या निशाण्यावर एक नव्हे तर 5 मोठे रेकॉर्ड्स आहेत. चला तर मग या रेकॉर्ड्सवर एक नजर टाकूया.
(1) आर अश्विन हा कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. आता तो कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात एक विकेट घेऊन इतिहास रचू शकतो. कसोटी सामन्यांच्या चौथ्या डावात 100 बळी घेणारा तो पहिला भारतीय आणि एकूण सहावा गोलंदाज ठरेल.
(2) आर अश्विन भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्यापासून फक्त 3 विकेट दूर आहे. सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड झहीर खानच्या नावे आहे, ज्यानं 31 बळी घेतले आहेत.
(3) आर अश्विननं कानपूर कसोटीत 4 विकेट घेतल्यास तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 मध्ये 52 बळी पूर्ण करेल. या WTC सायकलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो जोश हेझलवूडला मागे टाकेल.
(4) अश्विनला कानपूर कसोटीत 8 विकेट्सची घेत तर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल. या बाबतीत तो ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनला मागे टाकेल.
(5) बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अश्विनला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा सातवा गोलंदाज होण्यासाठी 9 बळींची गरज आहे.
हेही वाचा –
कुलदीपला संधी, सिराज ड्रॉप होणार? बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
इराणी चषकासाठी संजू सॅमसनकडे पु्न्हा दुर्लक्ष; या कारणांमुळे संघात स्थान नाही?
“आम्हाला आमच्या संघात विराट कोहलीला घ्यायला आवडेल”, या कर्णधारानं व्यक्त केली इच्छा