बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांचा शानदार खेळ पाहायला मिळाला. ढाकामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात रविवारी (25 डिसेंबर) भारताने 3 विकेट्सने विजय मिळवला, ज्यामुळे दोन सामन्यांची मालिका पाहुण्या संघाने 2-0 अशी जिंकली. दुसऱ्या कसोटीत अय्यर-अश्विन जोडीने नाबाद 71 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या विजयामुळे भारताने आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या गुणतालिकेतील दुसरे स्थान मजबूत केले आहे.
दुसऱ्या कसोटीत भारताचा विजय कठीण वाटत होता, कारण भारताने पहिल्या चार विकेट्स केवळ 37 धावसंख्येवरच गमावल्या होत्या. तर चौथ्या दिवशी जयदेव उनाडकट, रिषभ पंत आणि अक्षर पटेल या तीन विकेट्स लवकर पडल्या. यामुळे भारत हरतो की काय असे वाटत असताना आर अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी एकेरी धाव घेत भारताला विजयाच्याजवळ पोहोचवले. यावेळी अश्विनच्या बॅटमधून विजयी धाव पडली. त्याने चौकार मारताच जल्लोष केला. त्याच्या या जबरदस्त सेलेब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/cricketfanvideo/status/1606885405269581824?s=20&t=fZcbLp8FRaGvhsIz0LmsZg
दुसऱ्या डावात भारताकडून अश्विननेच अधिक धावा केल्या. त्याने 62 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. त्यासाठी त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. अय्यरने 4 चौकारांसह नाबाद 29 धावा केल्या. या डावात बांगलादेशच्या मेहदी हसन मिराज याने प्रभावशाली खेळी केली. त्याने 19 षटके टाकताना 63 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तरीही बांगलादेशला भारताविरुद्ध पहिला कसोटी विजय मिळवता आला नाही.
या सामन्यात बांगलादेशच्या दुसऱ्या डावात लिटन दास आणि झाकिर हसन यांनी अर्धशतकी खेळी केल्या होत्या. ज्यामुळे संघाला 231 धावसंख्या उभारता आली. त्यामध्ये अक्षरने 3 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि अश्विन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा केल्या. ज्यामध्ये रिषभ पंत याने 93 आणि अय्यरने 87 धावा केल्या. दोघांच्या या अद्भुत खेळीने भारताने पहिल्या डावात 87 धावांची आघाडी घेतली. R Ashwin Celebration in BANvIND Test Series 2nd Test Virat Kohli & Rahul reaction video goes viral
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्ध विजय मिळवताच टिम इंडियाला मिळाली आनंदाची बातमी, पाहा सामन्यानंतर काय घडले
आतल्या गोटातील बातमी! मालिका विजयानंतर कर्णधार राहुल म्हणाला, ‘खोटं बोलणार नाही, ड्रेसिंग रूममध्ये…’