---Advertisement---

Video: चेन्नई कसोटीत अश्विन अण्णाचा भन्नाट डान्स, प्रेक्षकांकडून शिट्ट्यांसह टाळ्यांचा कडकडाट

---Advertisement---

इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ३१७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. चेन्नई झालेल्या या कसोटी सामन्याद्वारे जवळपास एका वर्षानंतर प्रेक्षकांचे स्टेडियममध्ये पुनरागमन झाले. तब्बल १५ हजार प्रेक्षकांनी गजबजलेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंच्या उत्साहाला परिसीमा नव्हती. प्रेक्षक जेव्हा जल्लोषाने खेळाडूंना प्रोत्साहित करत होते, तेवढ्याच उत्स्फुर्तीने भारतीय खेळाडूंनीही त्यांचे मनोरंजन केले.

भारतीय फिरकीपटू आर अश्विनने गोलंदाजीसह अप्रतिम फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर क्षेत्ररक्षणावेळी हा दिग्गज आपल्या शानदार डान्स स्टेप्सने प्रेक्षकांना घायाळ करताना दिसला.

इंग्लंडचा दुसरा डाव चालू असताना अश्विन सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभारला होता. यावेळी आपले चाहते आपल्यासाठी चियर करत असल्याचे पाहून त्याने तमिळ सिनेसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता विजयच्या डान्स स्टेपची नक्कल केली. हे पाहून प्रेक्षक अजून जोरजोराने ओरडू लागले. अनेकांनी टाळ्याच्या गजरात त्याच्या डान्सचे कौतुक केले होते. अनेकांनी शिट्ट्या वाजून त्याला प्रतिसाद दिला. यावेळचा व्हिडिओ एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

विराट कोहलीनेही केले मनोरंजन
एवढेच नव्हे तर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही प्रेक्षकांचे पैसावसूल मनोरंजन केले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज उत्कृष्ट कामगिरी करत असताना विराटने प्रेक्षकांना त्यात सामील करून घेण्यासाठी शिट्ट्या वाजवण्याचा इशारा केला. ज्याला प्रेक्षकांनी तातडीने प्रतिसाद देत, शिट्टी वाजवणे सुरू केले.

प्रेक्षकांना मिळाली स्टेडियमध्ये जाण्याची परवानगी
कोरोना महामारीमुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा या बंद दरवाजाआड खेळवल्या जात होत्या. सध्या भारतात भारत विरुद्ध इंग्लंड ही कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या चेन्नई कसोटीत प्रेक्षकांना येण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी बीसीसीआयने मैदान क्षमतेच्या ५०% प्रेक्षकांना मैदानात येण्यास मान्यता दिली. त्यामुळे, प्रेक्षक आणि खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण असलेले दिसून आले.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय संघाने येऊ दिली नाही रूटची ‘सत्ता’, मोठ्या विक्रमापासून ठेवले वंचित

‘कॅप्टन’ विराटची कमाल! भारताच्या सर्वात मोठ्या ६ विजयांपैकी ५ विजय कोहलीच्या नेतृत्वातील, वाचा सविस्तर

पदार्पणात बळींचा पंचक, अखेर ४२ वर्षांनंतर अक्षरने संपवली ही प्रतिक्षा; ठरला दुसराच डावखुरा स्पिनर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---