भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी शिलेदार आर अश्विन सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. हातखंडा असलेल्या गोलंदाजीसह फलंदाजीतही त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने इंग्लंडच्या मोठमोठ्या फलंदाजांची शिकार केली आहे. त्यातही डावखुरा फलंदाज बेन स्टोक्सला त्याने सामन्यातील दोन्ही डावात तंबूचा रस्ता दाखवला आहे.
दुसऱ्या डावात डॅनियल लॉरेन्सची विकेट गेल्यानंतर स्टोक्स सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. सावध खेळी करत त्याने ५१ चेंडूत कशाबशा ८ धावा काढल्या. परंतु डावातील ३८ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अश्विनने विराट कोहलीच्या हातून त्याला झेलबाद केले. तत्पुर्वी पहिल्या डावातही अवघ्या १८ धावांवर अश्विनने त्याचा त्रिफळा उडवला होता.
विशेष म्हणजे, अश्विनने स्टोक्सला आपल्या फिरकीत फसवण्याची ही पहिली वेळ नव्हती. तर त्याने कसोटीत तब्बल १० वेळा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल १४ वेळा स्टोक्सला बाद केले आहे. यासह अश्विन हा स्टोक्सला सर्वाधिक वेळा आपली शिकार बनवणारा गोलंदाज ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बेन स्टोक्सला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज-
१४ वेळा- आर अश्विन
७ वेळा- कागिसो रबाडा
६ वेळा- नॅथन लायन
आर अश्विनने कसोटीत सर्वाधिक वेळा बाद केलेले फलंदाज-
१० वेळा- डेविड वॉर्नर
१० वेळा- बेन स्टोक्स
९ वेळा- ऍलिस्टर कूक
महत्त्वाच्या बातम्या-
विजय पथावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का! शुबमन गिल ‘या’ कारणामुळे दुसऱ्या डावाबाहेर
दस का दम! कसोटी क्रिकेटमध्ये दहाव्यांदा अश्विनने दाखवला स्टोक्सला तंबूचा रस्ता, पाहा व्हिडीओ






