आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या दोन्ही सामन्यात भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाज साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले होते. तर अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय संघाकडून आर अश्विनने गोलंदाजी करताना अप्रतिम कामगिरी केली होती. सामना झाल्यानंतर त्याने आपल्या पुनरागमनाविषयी मोठी प्रतिक्रीया दिली.
टी२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात वरूण चक्रवर्तीला संधी देण्यात आली होती. या दोन्ही सामन्यात त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. त्यामुळे त्याला बाहेर करून आर अश्विनला संधी देण्याची मागणी जोर धरू लागली होती. आर अश्विनला संधी मिळताच त्याने संधीचे सोने केले आणि अफगानिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात २ महत्वाचे गडी बाद केले.
हा सामना झाल्यानंतर आर अश्विन म्हणाला की, “गडी बाद करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि हे असे मुळीच नाहीये जे फक्त क्रिकेट सामना सुरू असताना घडते.”
तसेच आर अश्विनची टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केले होते. याबाबत बोलताना आर अश्विन म्हणाला की, “मला कधी कधी या खेळावर मत मांडणाऱ्या तज्ञांचे वाईट वाटते. मी २००७-०८ पासून क्रिकेटचे हे स्वरूप खेळतोय. हा खेळ खूप काही शिकवतो. तसेच या खेळात अनेक बदल देखील आले आहेत. मला वाटते की खेळाची समज अजूनही अनेक प्रकारे मागासलेली आहे.”
तसेच टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याबाबत आर अश्विन म्हणाला की, “अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करू शकता. परंतु टी -२० क्रिकेटमध्ये ते संभव नाही. गडी बाद करणं सोपं नसतं. तज्ञांनुसार, गोलंदाजीमध्ये देखील भागीदारी असते. जर मागचे षटक चांगले गेले असेल, तर पुढच्या षटकात गडी बाद करण्याची शक्यता आणखी वाढते.”
आर अश्विनने तब्बल ५ वर्षानंतर टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी स्थान मिळण्याबाबत तो म्हणाला की, “ही एक अशी बातमी होती, जी ऐकल्यानंतर मी खूप खुश झालो होतो. माझी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड होणे हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. मला संघासाठी काहीतरी खास करायचे होते.”
महत्वाच्या बातम्या-
एकसारखेच, पण आहेत वेगवेगळे! अफगाणिस्तानला मिळाला ‘बुमराह’, गोलंदाजी ऍक्शनचा व्हिडिओ चर्चेत
केवळ एक धाव काढणाऱ्या ‘युनिव्हर्स बॉस’ गेलच्या नावे टी२० विश्वचषकातील नकोसा विक्रम