टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या सुपर 12मधील दुसऱ्या ग्रुपमध्ये रविवारी (30 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेने भारताचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात डेविड मिलर याने नाबाद 59 धावांची खेळी केली. त्याच्या या महत्वपूर्ण खेळीमुळेच आफ्रिकन संघाने 19.4 षटकात 134 धावांचे लक्ष्य गाठले. मिलरने त्याच्या विलक्षण खेळीत तीन षटकार आणि चार चौकार मारले. या सामन्यात एक क्षण असा होता तो त्याची विकेट गमावणार होता, मात्र अश्विनने तसे केले नाही.
भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याच्याकडे स्फोटक फलंदाज डेविड मिलर (David Miller) याची गती थांबवण्याची संधी होती. झाले असे की दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या 18व्या षटकात मिलर नॉन-स्ट्रायकर एंडला उभा होता. त्याच षटकातील शेवटचा चेंडू फेकण्याआधी तो क्रीझच्या पुढे आला ते पाहून गोलंदाज अश्विनने त्याला क्रीझच्या मागे जाण्याची ते चेतावणी दिली, मात्र आऊट केले नाही. तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकण्यापासून केवळ 12 धावा दूर होता. अश्विनने त्याला आऊट केले असते तर सामन्याची स्थिती आज वेगळी असती.
आयसीसीने या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला. त्याच्या कॅप्टशनमध्ये लिहिले, ‘आपण मागे असल्याचे सुनिश्चित करा’. अश्विनने मिलरला बाद केले नाही परंतु त्याने त्याला मागे राहण्यास सांगितले.
https://www.instagram.com/reel/CkV2H32jNuy/?utm_source=ig_web_copy_link
या सामन्यात मिलरने एडन मार्करम याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 60 चेंडूत 76 धावांची भागीदारी केली. या दोघांनीही अर्धशतके केली. मार्करमने 41 चेंडूत 52 धावा केल्या. या विजयामुळे ते गुणतालिकेत 5 गुणांसह पहिल्या स्थानावर आले, तर भारत तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आला.
तत्पूर्वी पर्थच्या ऑप्टन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात, भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. सूर्यकुमार यादव (68 धावा) याच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने 20 षटकात 9 बाद 133 धावसंख्या उभारली. भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंग यांनी उत्तम कामगिरी बजावली. त्याने 4 षटकात 25 धावा देत क्विंटव डी कॉक आणि रायली रूसो या दोन विकेट घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! टी20 विश्वचषकातील सर्व चॅम्पियन संघ हरले, यंदा मिळणार नवा विजेता?
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…