---Advertisement---

विकेट गेल्याच्या संतापात अश्विनची गोलंदाज साऊथीशी बाचाबाची, मग पंत-मॉर्गनमध्येही जुंपली, अखेर…

On: मंगळवार, सप्टेंबर 28, 2021 7:42 PM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मंगळवारी (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२१ चा ४१ वा सामना झाला. शारजाहच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाने सध्या गुणतालिकेत टॉप-२ क्रमांकावर बादशाहत असलेल्या दिल्लीला पूर्णपणे बॅकफूटवर ठेवले. गोलंदाजी आणि फलंदाजीत सांघिक प्रदर्शन करत कोलकाताने दिल्लीवर ३ विकेट्सने सोपा विजय मिळवला. या सामन्यादरम्यान उभय संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

तर झाले असे की, धावांसाठी धडपडत असलेल्या दिल्लीकडून अंतिम षटकात कर्णधार रिषभ पंत आणि अष्टपैलू आर अश्विन फलंदाजी करत होते. डावातील २० वे षटक टाकण्यासाठी आलेल्या कोलकाताच्या वेगवान गोलंदाज टीम साऊथीच्या पहिल्याच चेंडूवर अश्विनने चौकार खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या नितिश राणामुळे त्याचा प्रयत्न फसला. राणाने सीमारेषेवर त्याचा सोपा झेल पकडला. यामुळे ८ चेंडूंमध्ये ९ धावा करत अश्विन झेलबाद झाला.

अश्विनची विकेट गेल्यानंतर साऊथी त्याला हाताने इशारा करत काहीतरी बोलताना दिसला. हे पाहून अश्विननेही त्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले. इतक्यावरच त्यांच्यातील वाद मिटला नाही तर, पुढे कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गननेही यामध्ये हस्तक्षेप केला. त्यानंतर दिल्लीचा कर्णधार पंतनेही त्याच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. हे पाहून पंचांना पुढाकार घेत हा वाद मिटवावा लागला. एकीकडून कोलकाताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिनेही अश्विन आणि पंतला सावरले.

भर मैदानात झालेल्या या विवादाच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

https://twitter.com/rishobpuant/status/1442820324718825483?s=20

दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, दिल्ली संघाला प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ विकेट्स गमावत फक्त १२७ धावा करता आल्या. दिल्लीकडून पंत आणि स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक ३९ धावा केल्या. तर कोलकाताकडून लॉकी फर्ग्युसन, सुनिल नारायण आणि वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

दिल्लीच्या १२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नितिश राणाने नाबाद ३६ धावांची खेळी केली. तसेच सुनिल नारायणने शेवटच्या षटकात फटकेबाजी करत १० चेंडूंमध्ये २१ धावांचे योगदान दिले. त्यामुळे कोलकाताने १८.२ षटकात दिल्लीचे आव्हान पूर्ण करत सामना जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या-

आधी दिला जोराचा चोप, मग थेट बत्त्या गुल; भर मैदानात फर्ग्युसन अन् स्मिथमध्ये ‘हाय व्होल्टेज ड्रामा’

वॉर्नरचे सनरायझर्स सोबतचे दिवस संपले का? खुद्द संघ प्रशिक्षकांनी दिले महत्त्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर

श्रीसंत म्हणाला, ‘त्यावेळी २ लाखांची साधी पार्टी करायचो, मग मी १० लाखांसाठी स्पॉट फिक्सिंग का करू?’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---