इंग्लंडविरुद्ध धरमशाला कसोटीत रविचंद्रन अश्विन 100 कसोटी सामने खेळणारा भारताचा 14वा खेळाडू ठरला. या खास प्रसंगी अश्विनसोबत त्याची पत्नी प्रीती नारायणन आणि दोन मुलीही मैदानावर हजर होत्या. क्रिकेटसोबतच अश्विन त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही सतत चर्चेत असतो. पत्नी प्रीती नारायणन नेहमीच अश्विनला सपोर्ट करते. या दोघांची लव्ह स्टोरी रोमँटिक चित्रपटांच्या कथेपेक्षा काही कमी नाही.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, आर अश्विन आणि प्रीती नारायणन लहानपणी एकाच शाळेत शिकले आहेत. अश्विन पहिल्याच नजरेत प्रितीच्या प्रेमात पडला. तेव्हा तो सातवीत होता. अश्विनचा प्रितीवर क्रश होता, जे शाळेतल्या सगळ्यांनाच माहीत होतं. मात्र क्रिकेटच्या सरावासाठी अश्विनला शाळा बदलावी लागली, ज्यामुळे तो आपलं प्रेम व्यक्त करू शकला नाही.
शाळा बदलली तरी अश्विन प्रीतीशी बोलण्यासाठी नेहमीच नवनवीन निमित्त काढत असे. तसेच दोघं सतत संपर्कात होते. कालांतरानं प्रितीलाही अश्विन मनापासून आवडायला लागला. शिक्षण संपल्यानंतर अश्विन क्रिकेटमध्ये व्यस्त झाला, तर प्रीती एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करू लागली. दोघांनाही वेळ मिळाला की ते एकमेकांना भेटायचे. मात्र, एवढं होऊनही दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं नाही.
अश्विन जेव्हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघात सामील झाला, तेव्हा प्रीती या संघाचं सोशल मीडिया हँडल हाताळत असे. सीएसकेच्या एका कार्यक्रमात दोघंही अचानक भेटलं. यावेळी अश्विननं ठरवलं होतं की, काही झाली तरी तो आज प्रीतीसमोर त्याच्या भावना व्यक्त करेल. झालं तेच. आपल्या अश्विननं चक्क 10 वर्षांनी आपलं प्रेम व्यक्त केलं!
आर अश्विन आणि प्रीती नारायणन यांचा विवाह 13 नोव्हेंबर 2021 रोजी झाला. लग्नानंतर प्रीतीनं अनेकदा सांगितलंय की, सध्या ते दोघं पती-पत्नी असले तरी त्यांच्यातील मैत्री अजूनही कायम आहे. ते दोघं अजूनही खूप भांडतात, मात्र हे भांडण लगेच मिटतं देखील. या दोघांमध्ये खूप प्रेम आहे. प्रीती जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा पती अश्विनचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचते.
प्रीती बी.टेक मध्ये पदवीधर आहे. आर अश्विन आणि प्रीती नारायणन यांना दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचं नाव अकिरा असून तिचा जन्म 2015 मध्ये झाला. तर दुसऱ्या मुलीचं नाव आध्या असून तिचा जन्म 21 डिसेंबर 2016 रोजी झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
वडिलांनी आत्महत्या केली, आईला कॅन्सर झाला; ‘बेझबॉल’चा पोस्टर बॉय बेअरस्टोचा 100 कसोटीपर्यंतचा प्रवास
फोटो ऑफ द डे! 100व्या कसोटीसाठी अश्विनसोबत फॅमिलीही मैदानात, द्रविडकडून मिळाली खास कॅप
धरमशाला कसोटीत युवा फलंदाजाचं पदार्पण, 24 वर्ष जुना विक्रम मोडला