भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूर येथील ग्रीनपार्कवर खेळवला जात आहे. ज्यामध्ये दोन्ही पहिल्यांदा ओल्या मैदानामुळे टाॅसला आणि सामना सुरु व्हायला विलंब झाला. पूर्व हवामान अंदाजानुसार कानपूर येथे पहिल्या दोन दिवसात पावसाची शक्यत आधीच वर्तवली आहे. आता सामन्यात पावसाचा अडथळा होत आहे.
दरम्यान सुरुवातीला सकाळी टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. ज्यामधये पहिल्या सत्रात भारताकडून केवळ आकाश दीपला यश मिळाले. मात्र दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला चेन्नई कसोटीचा नायक रविचंद्रन अश्विनने आपली जादू दाखवत कर्णधार नजमुल हुसेन शांतोला बाद करून बांग्लादेशला मोठा धक्का दिला. नझमुल हुसेन शांतोला बाद करून अश्विनने आशिया खंडात कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याचा भारतीय विक्रम केला.
बांगलादेशसाठी तिसऱ्या विकेटसाठी मोमीनुल आणि कर्णधार शांतो यांची भागीदारी धोकादायक वाटत होती. जे की रविचंद्रन अश्विनने तोडली. अश्विनने लंचब्रेकनंतर येताच दुसऱ्याच षटकात एलबीडब्ल्यू केले. शांतोने 57 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली.
अश्विनने बांग्लादेशच्या कर्णधाराला बाद करताच तो आशिया खंडात भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज बनला. त्याने अनिल कुंबळेचा 82 सामन्यांच्या 144 डावात 419 बळींचा विक्रम मोडला. आता या बातमी आखेरपर्यंत अश्विनने 97 सामन्यांच्या 171व्या डावात 420 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये अश्विनने 33 डावात पाच विकेट्सही घेतल्या आहेत.
HISTORY CREATED BY ASHWIN. 🐐
– Ashwin now has the most wickets by an Indian in Asia in Test history. pic.twitter.com/wwNhc3UEt3
— Johns. (@CricCrazyJohns) September 27, 2024
आशियातील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर रविचंद्रन अश्विन आता फक्त श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या मागे आहे. मुरलीने त्याच्या कारकिर्दीत आशियामध्ये 97 कसोटी सामने खेळले आणि 171 डावांमध्ये 52 पाच विकेटसह 612 विकेट घेतल्या. मुरलीधरनचा विक्रम मोडणे अश्विनसाठी सोपे नाही. कारण तो आता 38 वर्षांचा झाला आहे. अशा परिस्थितीत तो किती दिवस खेळणार हे पाहणे रंजक असेल.
हेही वाचा-
हुबेहुबचं .! विराट कोहलीने केली बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल; VIDEO पाहाच
यशस्वी जयस्वालचा खतरनाक झेल, फलंदाज-गोलंदाज कोणाचाच विश्वासच बसेना! VIDEO पाहाच
ind vs ban; पहिल्या सेशननंतर पावसाची एन्ट्री; लंच ब्रेकपर्यंत बांग्लादेश 74-2 स्थितीत