बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. जी मालिका भारताने केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली 2-0 अशी जिंकली. यामधील दुसऱ्या कसोटीत सामनाविजयी भुमिका निभावणारा आर अश्विन याला आयसीसी क्रमवारीत मोठा फायदा आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (28 डिसेंबर) कसोटी क्रमवारी जाहीर केली. ज्यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी मोठी उडी घेतली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) या भारताच्या अनुभवी फिरकीपटूने गोलंदाजीनंतर फलंदाजीतही उल्लेखनीय कामगिरी केली. ज्यामुळे भारताने तो रोमांचक सामना 3 विकेट्सने जिंकला. हा सामना जिंकताच भारताच्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा आणखी मजबूत झाल्या.
या सामन्यात अश्विनने 6 विकेट्स घेत नाबाद 42 धावाही केल्या होत्या. त्याने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) बरोबर नाबाद 71 धावांची भागीदारी केली होती. अश्विनला त्याच्या या उत्तम कामगिरीचा फायदा झाला. त्याने आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत संयुक्तपणे दुसरे स्थान गाठले आहे. या क्रमांकावर जयप्रीत बुमराहही आहे. या दोघांचे गुण समान असे 812 आहेत.
त्याचबरोबर अश्विनने अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसरे स्थान गाठले असून तो संघसहकारी रविंद्र जडेजा याच्या जवळ पोहोचला आहे. जडेजा पहिल्या स्थानावर आहे.
अय्यरने पहिल्या सामन्यात 89 धावा केल्या आणि दुसऱ्या सामन्यात 145 धावांचे लक्ष्य गाठताना अश्विनला योग्य साथ दिली होती. यामुळे त्याने 10 स्थानांनी झेप घेत 16वे स्थान गाठले आहे. रिषभ पंत आणि रोहित शर्मा हे भारताचे दोनच फलंदाज पहिल्या दहामध्ये आहेत. पंत सहाव्या आणि रोहित नवव्या स्थानावर आहे.
अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव याने दुसऱ्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने गोलंदांजाच्या क्रमावरीत 5 स्थानांनी पुढे जात 33वे स्थान गाठले आहे. तर अष्टपैलूंच्या यादीत 3 स्थानांनी उडी घेत 48वे स्थान गाठले आहे.
India stars on the rise in the @MRFWorldwide ICC Men's Test Player Rankings after thrilling win over Bangladesh 🔥
Details 👇 https://t.co/FbVElpzVjz
— ICC (@ICC) December 28, 2022
बांगलादेशच्या लिटन दास याने महत्वाच्या 73 धावा करताना दोन स्थानांनी झेप घेत 12वे स्थान गाठले आहे. भारताच्या वरच्या फळीला त्रास देणारा तैजुल इस्लाम यालादेखील दोन स्थानांचा लाभ झाला आहे. तो गोलंदाजांच्या क्रमवारीत 28व्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर मेहदी हसन आहे. R Ashwin performed well vs BAN & rewarded in recent set of ICC Test rankings.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेस्सीने धोनीच्या मुलीला पाठवली खास भेट, झिवाने इंस्टाग्रामवर केला खुलासा
Video: अर्जुनची धोनीसारखी विकेटकीपिंग पाहिली का? केले दोन भन्नाट रनआउट