झिम्बाब्वे (Zimbabwe) संघाचा माजी कर्णधार ब्रेंडन टेलर (Brandon Taylor) याने सोमवारी (२४ जानेवारी) एक मोठा खुलासा केला होता. ब्रेंडन टेलरचे म्हणणे होते की, प्रायोजकत्व मिळवून देण्यासाठी टी२० लीग स्पर्धा सुरू व्हावी यासाठी त्याने भारतात काही लोकांची भेट घेतली होती. परंतु, त्यांनी त्याचा चुकीचा फायदा घेत ब्लॅकमेल केले होते आणि सामना फिक्सिंग करण्यासाठी सांगितले होते. हा खुलासा केल्यानंतर अनेकांनी आपले मत मांडायला सुरुवात केली आहे. दरम्यान, भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन याने (R ashwin) देखील ट्विट करत याबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे.
हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आर अश्विनने ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “जनजागृती पसरवा… पोकर टेबलवर समोरचा व्यक्ती आपल्या दोन पर्याय देत असतो. एकतर खेळ सुरू ठेवा नाहीतर टेबल सोडून निघून जा. त्यावेळी टेबल सोडून निघून जाणे हा योग्य पर्याय असतो. ब्रेंडन आणि त्याच्या कुटुंबाला देव शक्ती देवो.”
Spread the awareness!! Most times the hand dealt to us at the poker table gives us an option to bet or fold!! Its important to fold and leave the table! All strength to Brendan and his family🙏 https://t.co/FqsvTd4ao7
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) January 24, 2022
ब्रेंडन टेलरने आपली चूक मान्य करत दावा केला आहे की, भारतीय उद्योगपतीने त्याला भारतातून प्रायोजक आणि झिम्बाब्वेमध्ये टी२० लीग स्पर्धा खेळवण्यासाठी चर्चा करण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी त्याला भारताचा दौरा करण्यासाठी १५ हजार डॉलर्स देण्यात आले होते.
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “आम्ही त्यावेळी मद्यपान केले होते. त्यानंतर त्याने मला कोकिन दिली. त्याने आधीच कोकिनचे सेवन केले होते. मी मूर्खपणा करत कोकीनचे सेवन केले. त्यानंतर सकाळी तेच लोक माझ्या हॉटेलच्या रूममध्ये आले आणि मला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करू लागले. ते म्हणाले होते की, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमच्यासाठी स्पॉट फिक्सिंग कर, अन्यथा हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करू.”
या सर्व घटनेनंतर ब्रेंडन टेलर मानसिक दबावात आला होता. त्याने २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. त्याने झिम्बाब्वेसाठी २०५ वनडे सामना, ३४ कसोटी आणि ४५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
राहुल खरोखरच तुम्हाला कर्णधार वाटतो का? बीसीसीआय अधिकाऱ्याचा पत्रकाराला प्रतिप्रश्न
अख्तर म्हणतोय,”टी२० विश्वचषकात पाकिस्तान पुन्हा भारताला हरवेल”
हे नक्की पाहा: