भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला होता. हा विजय न्यूझीलंड संघासाठी खूप खास होता, कारण तब्बल २१ वर्षानंतर न्यूझीलंड संघाने आयसीसीची ट्रॉफी जिंकली होती.त्यामुळे विजयाचा जल्लोष ही जोरदार झाला होता. हा जल्लोष दिग्गज भारतीय गोलंदाजाला पचला नव्हता.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडू निराश झाले होते. कारण २ वर्षांची मेहनत एकाच सामन्यात वाया गेली होती. या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा फिरकी गोलंदाज आर अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की,”न्यूझीलंड संघातील खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये विजयाचा जल्लोष साजरा करत होते. कारण त्यांच्याइथे अशी परंपरा आहे. हे पाहणे माझ्यासाठी खूप कठीण होते. माझे असे मत आहे की,कुठल्याही मैदानात हॉटेलची रूम असल्यामुळे, तुम्हाला या सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो. मला आठवण आहे की, न्यूझीलंड संघातील खेळाडू रात्री १२ वाजेपर्यंत जल्लोष साजरा करत होते. ते ज्याप्रकारे जल्लोष साजरा करत होते ते,एक प्रकारचे युद्ध घोषणे सारखेच भासत होते.आम्ही खूप निराश झालो होतो कारण,आम्ही विजय मिळवण्यात अपयशी ठरलो होतो.”(R ashwin said newzealand players celebrated after WTC final until late which was hard to see for the losing team)
विश्रांती घेणे आमच्यासाठी गरजेचे
येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी,भारतीय संघाला २० दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.
याबाबत बोलताना आर अश्विनने म्हटले की,”आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून बायो-बबल मध्ये होतो. आम्हाला आता बाहेर येऊन मोकळ्या हवेत श्वास घेण्याची संधी मिळाली आहे. मी एक कार भाड्याने घेतली आहे. त्याच कारमध्ये आम्ही इंग्लंड फिरण्यासाठी निघालो होतो. सुरुवातीला आम्ही डेवोनला गेलो होतो. ती एक खूप सुंदर जागा आहे. आम्ही एका उंच डोंगराच्या ठिकाणी गेलो होतो. जिथे डोंगर आणि समुद्र एकमेकांना जोडले जातात. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आमच्याकडे भरपूर वेळ होता. हे तर निश्चित आहे की, आम्हाला सराव करायचा आहे. परंतु विश्रांती मिळाल्यामुळे आम्ही तरोताजा होणार यात काही शंका नाही. बबलमध्ये राहणे खूप कठीण आहे. गेल्या दीड वर्षापासून आम्ही बायो बबलमध्ये आहोत.
महत्वाच्या बातम्या-
सानियाचे ‘ग्रँड कमबॅक’! विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत मिळवला विजय, मुलाने वाढविला उत्साह
जेव्हा वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला जगातील सर्वात कमजोर संघाने दाखवला होता चांगलाच इंगा
“मी अशा खेळाडूंच्या कानशिलात लगावली असती,” विश्वविजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया