चेपॉक स्टेडियमवर १३ फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघाचा दुसरा कसोटी सामना सुरू झाला असून या सामन्याला खूपच रंगत चढत आहे. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या १३४ डावांवर उरकला असून दुसऱ्या दिवशीपर्यंत भारताने २४९ धावांची बढती घेतली आहे.
क्रिकेटमध्ये नेहमीच पाहिला जात की, प्रत्येक क्रिकेटपटूची कोणत्या-ना-कोणत्या क्रिकेटपटूसोबत तुलना केली जाते.
अशातच भारतीय संघात देखील असेच काहीसे पाहायला मिळाले. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर यष्टीरक्षणाची धुरा भारतीय संघात रिषभ पंतने हाती घेतली होती. परंतु अशा वेळीसुद्धा रिषभच्या खेळीची तुलना धोनी आणि वृद्धीमान साहा यांच्यासोबत होत असते. या सर्वांवर उजेड पाडत आर अश्विन याने तुलना करणाऱ्यांना धारेवर धरले आहे.
अनुभवी फिरकीपटू अश्विनने रविवारी रिषभची बाजू घेऊन त्याची तुलना इतरांशी करण्याऐवजी त्याच्या सामर्थ्यानुसार खेळण्याची त्याला संधी देण्यात यावी असे सांगितले. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसानंतर अश्विन म्हणाला की, “पंतची तुलना सतत धोनीशी केली जाते आणि आता त्याच्या यष्टीरक्षणाची तुलना साहासोबत केली जात आहे. बऱ्याच वेळा अशा तुलना थांबवण्याची आवश्यकता असते, तेव्हाच खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो.
पुढे तो म्हणतो की, “रिषभ चांगली फलंदाजी करत आहे. सोबतच आपल्या यष्टीरक्षणावर देखील खूपच मेहनत घेत आहे. बऱ्याच वेळा तुमची तुलना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसोबत केली जाते आणि हे तुमच्यासाठी फार अवघड असू शकत. रिषभकडे चांगली क्षमता आहे म्हणून तो आज इथवर पोहचू शकला आणि मला यात काडीमात्र शंका नाही की तो आपली कामगिरी आणखी चोख बजावेल.”
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत पंतने चांगली कामगिरी केली होती. त्याने ब्रिस्बेनमध्ये ८९ धावांची नाबाद खेळी खेळून भारताला प्रथमच गाबा मैदानावर विजय मिळवून दिला होता.
दुसरीकडे भारतीय भूमीवर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचल्यावर अश्विनने हरभजन सिंगची माफी मागितली. दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात अश्विनने बेन स्टोक्सला त्याच्या फिरकीच्या जोरावर बाद करत हरभजनचा रेकॉर्ड मोडत २६६ बळी घेतले. हरभजन सिंगच्या खात्यात २६५ विकेट्सचा समावेश होता.
अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ७६ सामने खेळले असून ३९१ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. तर एकदिवसीय १११ सामन्यात त्याने १५० विकेट्स घेतल्या आहेत. टी२० आंतरराष्ट्रीय ४६ सामन्यात त्याच्या नावावर ५२ विकेट्सचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चालू सामन्यात रोहित शर्माने रिषभ पंतच्या डोक्यात मारली टपली, पाहा गमतीशीर व्हिडिओ