---Advertisement---

“विराटने एका चेंडूसाठी 7 पर्याय सुचविलेले”, अश्विनने जागवल्या पाकिस्तानविरुद्धच्या टी20 विश्वचषक विजयाच्या आठवणी

On: गुरूवार, जून 29, 2023 10:31 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने मागील वर्षी ऑस्ट्रेलिया झालेल्या टी20 विश्वचषकाच्या साखळी फेरीत पाकिस्तानला पराभूत करण्याची कामगिरी केली होती. भारतीय संघ अडचणीत सापडलेला असताना विराट कोहलीने अखेरपर्यंत नाबाद राहत एक अविस्मरणीय खेळी या सामन्यात केलेली. विजयी धाव भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्र अश्विनीच्या बॅटमधून आलेली. त्यावेळी विराटने आपल्याला काय सल्ला दिला याबाबतचा खुलासा आता अश्विनने केला आहे.

मेलबर्न येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 160 धावांचे आव्हान मिळाले होते. भारतीय संघाने आपले पहिले चार फलंदाज झटपट गमावल्यानंतर विराट कोहली अखेरपर्यंत नाबाद राहिला. अखेरच्या षटकात 16 धावांची गरज असताना हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक हे बाद होऊन परतले होते. अखेरचा चेंडूवर दोन धावा आवश्यक असताना फलंदाजीला आलेल्या अश्विनी संयम दाखवत हा चेंडू सोडून दिल्याने वाईड झाला. त्यानंतर अखेर एक धाव काढत त्याने भारताला एक अविस्मरणीय विजय मिळवून दिलेला.

त्यावेळची आठवण सांगताना अश्विन म्हणाला,

“जेव्हा मी विश्वचषकात अंतिम चेंडूसाठी पाकिस्तानविरुद्ध फलंदाजीसाठी आलो, तेव्हा विराट कोहलीने मला तो एक चेंडू खेळण्यासाठी तब्बल 7 पर्याय दिले. जेव्हा मी विराटच्या डोळ्यांकडे पाहिलं, तेव्हा तो इतका आत्मविश्वास दिसत होता की, दुसऱ्या ग्रहावरील आहे. ही विराटची जबरदस्त खेळी होती. हा सामना आतापर्यंतच्या सर्वोत्तम टी20 सामन्यांपैकी एक होता.”

या सामन्यात भारतीय संघाने आपले पहिले चार फलंदाज केवळ 31 धावांमध्ये गमावले होते. विराटने एक बाजूने किल्ला लढवताना अखेरपर्यंत नाबाद राहत 82 धावांची खेळी केलेली. ही खेळी टी20 इतिहासातील सर्वोत्तम खेळी पैकी एक मानली जाते.

(R Ashwin Speaks About Virat Kohli And His 2022 India Vs Pakistan Match)

महत्वाच्या बातम्या
पुणेरी बाप्पा Qualifier 2 मधून आऊट, कोल्हापूर टस्कर्सला मिळालं फायनलचं तिकीट
बुमराह कधी करणार पुरनागमन? विश्वचषकाचे वेळापत्रक येताच समोर आली मोठी अपडेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---