---Advertisement---

…आणि अश्विनमुळे चेन्नईचे प्रेक्षक भावुक, समालोचकाच्या तमिळ भाषेतील प्रश्नांची अश्विनने दिली तमिळमध्येच उत्तरं

---Advertisement---

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना नुकताच पार पडला. पहिल्या डावातील १९५ धावांच्या आघाडीत २८६ धावांची भर पाडत भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी ४८६ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ अवघ्या १६४ धावांवर गारद झाला. परिणामत भारताने ३१७ धावांच्या मोठ्या फरकाने सामना खिशात घातला आणि मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. त्यानंतर सामनावीर ठरलेल्या आर अश्विनकडून सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांना खास भेट मिळाली.

सामना संपल्यानंतर अश्विन सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी गेला. त्यावेळी समालोचक मुरली कार्तिकने अश्विनच्या बोलीभाषेत अर्थात तमिळमध्ये त्याला प्रश्न विचारला. यावर अश्विननेही त्याला नाराज न करता तमिळमध्येच उत्तर दिले.

अश्विन तमिळमध्ये समालोचक कार्तिकला म्हणाला की, कदाचित यापुढे मी चेन्नईच्या मैदानावर सामना खेळू शकायचो नाही. परंतु मी या सामन्यात अतिशय लक्षणीय कामगिरी केली आहे. माझ्या कसोटी कारकिर्दीतील हे माझे सर्वात आवडते प्रदर्शन ठरले आहे. आम्ही प्रेक्षक नसताना एक सामना गमावला आणि आता प्रेक्षकांच्या उपस्थितीत एक सामना जिंकला आहे. त्यामुळे चेन्नई कसोटीतील हा विजय मी प्रेक्षकांना समर्पित करू इच्छितो.

अश्विनच्या या वक्तव्याचा अर्थ भलेही सर्व प्रेक्षकांना समजला नसेल. परंतु मुळचे चेन्नईचे रहिवासी असलेले प्रेक्षक मात्र त्याच्या बोलणे ऐकून भावनिक झाले. यावेळचा त्यांचा व्हिडिओ एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

https://twitter.com/away_idle/status/1361581800200396800?s=20

https://twitter.com/imstillprz/status/1361582071513190402?s=20

आर अश्विनची कामगिरी

अश्विनच्या कामगिरीविषयी बोलायचे झाले तर, त्याने पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ३ असा एकूण ८ विकेट्स घेतल्या. तसेच दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने झुंजार शतकी खेळीही केली. याचमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsENG 2nd Test : भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची शरणागती, तब्बल ३१७ धावांनी टीम इंडियाचा दणदणीत विजय

अश्विन स्टोक्सच्या क्रिकेट कुंडलीचा शनी! एक-दोन नव्हे तब्बल ‘इतक्यांदा’ धाडलंय तंबूत

विजय पथावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का! शुबमन गिल ‘या’ कारणामुळे दुसऱ्या डावाबाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---