2019 आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीलाच मंकडींग प्रकरण चांगलेच गाजले होते. या आयपीएल मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) कर्णधार अश्विनने (R Ashwin) राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जॉस बटलरला (Jos Buttler) मंकडींग करुन बाद केले होते. त्यावेळी याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात शुक्रवारी(31 जानेवारी) अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यातही मंकडींग झाले. या सामन्यात अफगाणिस्तानचा गोलंदाज नूर अहमदने पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद हुरेराला तो नॉन-स्ट्रायकर एन्ड असताना मंकडींग करुन बाद केले. विशेष म्हणजे हुरेराने 64 धावांची खेळी केली होती.
https://twitter.com/cricketworldcup/status/1223267303665688578
त्यामुळे आता पुन्हा एकदा मंकडींग हा चर्चेचा विषय ठरला आहे. यावर अनेकांनी मते व्यत्त केली आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मंकडींगचा नियम काढून टाकण्याची मागणी केली आहे. मात्र त्याच्या मागणीवर आर अश्विनने प्रतिउत्तर देत त्याला ट्रोल केले आहे.
अँडरसनने ट्विट केले आहे की ‘आयसीसी आपण हा (मंकडींग) नियम काढू शकतो का?’
https://twitter.com/jimmy9/status/1223313338874179586
यावर अश्विनने उत्तर दिले आहे की ‘कायदा काढून टाकण्यासाठी थोडा विचार-विमर्श आवश्यक आहे! पण आत्ता तरी तू श्रेडरने (एकादी गोष्ट कापण्यासाठी असणारी मशीन) काम चालवून घे’
https://twitter.com/ashwinravi99/status/1223504875025326081
झाले असे की जेव्हा अश्विनने आयपीएल 2019 दरम्यान बटलरला मंकडींग केले होते, तेव्हा अँडरसनने अश्विनवर टीका करत अश्विनचा फोटो मशिमनध्ये टाकून कापला होता. त्यामुळे या गोष्टीची आठवण ठेवत अश्विनने मंकडींगचा नियम काढण्याची मागणी करणाऱ्या अँडरसनवर टीका केली आहे.






