---Advertisement---

आर अश्विनला संघसहकाऱ्यांकडून प्रॉब्लेम? ट्विटरवर केले सर्व क्लियर

On: सोमवार, डिसेंबर 26, 2022 4:23 PM
---Advertisement---

बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. ज्यामध्ये भारताने यजमानांना 2-0 असे पराभूत केले. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा अनुभवी अष्टपैलू आर अश्विन याने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने पहिले गोलंदाजीत 6 विकेट्स घेतल्या, तर विजयाचा पाठालाग करताना महत्वपूर्ण नाबाद 42 धावांची खेळी केली. सामन्यानंतर अश्विनने एक सविस्तर ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्याने त्याला संघसहकाऱ्याकडून कोणतीच अडचण नाही असे सांगितले आहे.

भारताचा स्टार रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने बांगलादेशविरुद्ध सामनाविजयी खेळी केली. यानंतर त्याने ट्विटरवर लिहिले, ‘जेव्हापासून मी भारतीय जर्सी अभिमानाने घातली तेव्हापासून “ओव्हरथिंकिंग” अनुसरली आहे. मी काही काळ याबद्दल विचार केला आहे आणि मला विश्वास आहे की लोकांच्या मनातून हा शब्द पुसून टाकण्यासाठी मी पीआरची (जनसंपर्क) मदत घेतली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा खास असतो.’

अश्विनने अशा गंभीर तीन पोस्ट लिहिल्या. ज्याच्या शेवटी त्याने लिहिले, ‘मला कोणत्याही संघसहकार्‍याशी किंवा कोणाशीही कोणतीही अडचण आली नाही. हे मी संक्रमणादरम्यान वाचलेल्या काही लेखांच्या प्रतिसादात लिहिले आहे. हा शब्द धोक्याचा ठरेल हे समजायला मला 13 वर्षे लागली आणि आशा आहे की ही पोस्ट वाचणाऱ्या काही तरुणांना काही वर्षे आणखी मिळतील.’

बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या डावात नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अश्विनने सामनाविजयी खेळी करताना कसोटीतील मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने वेस्ट इंडिजच्या विन्सटन बेंझामिन यांचा विक्रम मोडला. बेंझामिन यांनी 1988मध्ये पाकिस्तानविरुद्ध नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 40 धावा केल्या होत्या. यामुळे अश्विन कसोटीमध्ये नवव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

अश्विनने बांगलादेशविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली, त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यात सामनावीर ठरला. त्याने आतापर्यंत 88 कसोटी सामन्यात 3043 धावा केल्या आणि 449 विकेट्स घेतल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयला जोर का झटका! आयपीएल 2023 च्या धमाकेदार आयोजनावर आयसीसीने फेरले पाणी
ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सच्या ‘या’ कृत्यावर संतापले चाहते, हार्दिकच्या व्हिडिओमुळे पेटला नवा वाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---