जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव नुकताच पार यामध्ये अनेक खेळाडूंना कोट्यावधींच्या बोली लागल्या. त्यामुळे बीसीसीआय आयपीएल 2023 चे आयोजन मोठ्या दिमाखात करण्याचा प्रयत्न करत होती. त्या दिशेने तयारी सुरू झाली असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतलेल्या एका निर्णयामुळे बीसीसीआयचा हा प्रयत्न फसू शकतो.
आयपीएल 2023 साठी अडीच महिन्यांचा कालावधी मिळाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली होती. त्यामुळे पुढील वर्षी आयपीएल आणखी मोठी होणार असा कयास लावला जात होता. या पार्श्वभूमीवरच आयपीएल तब्बल 74 दिवस आयोजित करण्याचा घाट बीसीसीआयने घातलेला. मात्र, बीसीसीआयला आता आपली ही कल्पना गुंडाळावी लागणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2023 ची सुरुवात 1 एप्रिल रोजी होऊन 31 मे रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत ही स्पर्धा साठ दिवस खेळली जाईल. त्यानंतर 7 जूनपासून ओव्हल येथे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार आयपीएल सुरू होण्याच्या अथवा संपल्यानंतर कोणतीही स्पर्धा सात दिवसानंतर सुरू होऊ शकते. त्यामुळे आयपीएल आणखी 14 दिवस पुढे करता येणार नाही. भारतीय संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यास खेळाडू तिकडे जाण्यास प्राधान्य देतील. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा बीसीसीआयला आयपीएल दोन महिन्यातच पूर्ण करावी लागेल.
दुसरीकडे, मार्च महिन्यात महिला आयपीएलही सुरू होण्याची शक्यता आहे. तो कालावधी व पुरुष आयपीएलचा कालावधी मिळून बीसीसीआयकडे आयोजनासाठी 75 दिवस असतील.
(IPL 2023 Will Have 60 Day Window)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सच्या ‘या’ कृत्यावर संतापले चाहते, हार्दिकच्या व्हिडिओमुळे पेटला नवा वाद
डीन एल्गरला सांताकडून ‘गिफ्ट’! चेंडू स्टम्पला लागूनसुद्धा राहिला नाबाद, व्हिडिओ व्हायरल