---Advertisement---

व्हिडिओ: “मैं तुम पर भरोसा कर के एक रन लिया, अब तू…,” चेन्नई कसोटीत अश्विनची सिराजला वॉर्निंग

On: मंगळवार, फेब्रुवारी 16, 2021 5:08 PM
---Advertisement---

आर अश्विनच्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या कसोटीत केलेल्या शतकी खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अश्विनने ज्या दृढतेने आणि संयमाने फलंदाजी केली, ती खरच कौतुकास्पद होती. आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर डावाखेर प्रत्येक चेंडूवर मोहम्मद सिराजसोबत मिळून अधिकाधिक धावा करण्याचा तो प्रयत्न करीत होता.

आपली किंवा सिराजची विकेट गेली तर भारतीय संघाचा डाव संपुष्टात येईल, याची त्याला जाणीव होती. यादरम्यान ज्यावेळी अश्विन १०४ धावा काढून नॉन स्ट्राईक बाजूवर आला. तेव्हा तो सिराजला चेतावणी देत म्हणाला की, “मी तुझ्यावर विश्वास ठेऊन एक धाव काढून नॉनस्ट्राईक वर आलो आहे. मग तू माझा विश्वास तोडू नकोस.”

अश्विन हे बोलता क्षणीच सिराजने जॅक लीचच्या चेंडूवर जोरदार षटकार लावत त्याचा विश्वास दृढ ठेवला. मात्र यानंतर अश्विन जास्तवेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि फक्त दोन धावा काढून पुन्हा तंबूत परतला. परंतु त्याच्या १४८ चेंडूतील १०६ धावांच्या योगदानामुळे भारतीय संघाने ४८६ धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवले होते.

अश्विनचा सिराजला गमतीने चेतावणी देतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर फारच व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी  या व्हिडिओला अधिक पसंती दर्शविली आहे.

https://twitter.com/sandybatsman/status/1361263273438367745?s=20

भारतीय संघाचे कसोटी मालिकेत दमदार पुनरागमन
कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावून पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात आक्रमक खेळी खेळून इंग्लंडसमोर ३३० धावांचा डोंगर उभा केला होता. त्याच्या प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ अवघ्या १३४ धावांवर बाद झाला आणि भारतीय संघाला १९५ धावांची आघाडी मिळाली होती. तर दुसऱ्या डावात भारताने २८६ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर ४८२ धावांचे लक्ष्य दिले. अखेर इंग्लंड संघ १६४ धावाच करू शकला आणि भारताने ३१७ धावांनी सामना जिंकला. सोबतच मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

आर अश्विनची कामगिरी
अश्विनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ७६ कसोटी सामने खेळले असून ३९४ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. त्याचप्रमाणे एकूण १११ एकदिवसीय आणि ४६ टी२० सामन्यात त्याने अनुक्रमे १५० आणि ५२ विकेट्स त्याने घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीने केली ‘कॅप्टनकूल’ धोनीची बरोबरी, आता स्मिथचा विक्रम निशाण्यावर

“पंत पुढची १० वर्षे क्रिकेटचं मैदान गाजवेल,” भारतीय दिग्गजाकडून कौतुकाची थाप

‘आम्ही मुळे कधीच काढून फेकली होती आता…’, अमिताभ बच्चन यांनी केले इंग्लंडला ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---